जाहिरात

Vomiting While Travelling: प्रवासात उलट्या होतात? चिंता सोडा! मोशन सिकनेसवरील रामबाण इलाज आणि सोपे उपाय

Vomiting While Travelling:  प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटणे, उलट्या होणे किंवा चक्कर येणे याला मोशन सिकनेस (Motion Sickness) म्हणतात.

Vomiting While Travelling:  प्रवासात उलट्या होतात? चिंता सोडा! मोशन सिकनेसवरील रामबाण इलाज आणि सोपे उपाय
Vomiting While Travelling: हा मोठा आजार नाही, पण त्यामुळे प्रवासाचा संपूर्ण आनंद खराब होतो.
मुंबई:

Vomiting While Travelling:  प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटणे, उलट्या होणे किंवा चक्कर येणे याला मोशन सिकनेस (Motion Sickness) म्हणतात. हा काही मोठा आजार नाही, पण त्यामुळे प्रवासाचा आनंद पूर्णपणे खराब होतो. विशेषतः डोंगराळ भागात प्रवास करताना ही समस्या जास्त दिसून येते. बऱ्याच कालावधीनंतर प्रवास करणाऱ्यांपासून ते नियमित प्रवाशांपर्यंत, कोणालाही हा त्रास होऊ शकतो.

मोशन सिकनेसची लक्षणे | Symptoms of Motion Sickness

  • सतत उलट्या किंवा मळमळ.
  • चक्कर येणे आणि डोके जड वाटणे.
  • आळस आणि थकवा जाणवणे.
  • पोटदुखी आणि अपचन.
  • चिडचिड होणे किंवा अस्वस्थ वाटणे.

प्रवासात उलट्या का होतात? | Causes of Motion Sickness

मोशन सिकनेस तुमच्या मेंदू आणि इंद्रियांमधील समन्वय बिघडल्यामुळे होते. तुम्ही चालत्या वाहनामध्ये बसता, तेव्हा तुमचे डोळे आणि कान मेंदूला वेगवेगळे संकेत पाठवतात. या गोंधळामुळेच मळमळ, चक्कर आणि उलट्यांसारख्या समस्या निर्माण होतात.

मोशन सिकनेस टाळण्यासाठी सोपे उपाय | best tips to stop travel vomiting

प्रवासादरम्यान पुस्तक किंवा मोबाईल स्क्रीन पाहणे टाळा. यामुळे मेंदूला चुकीचे संकेत मिळतात आणि उलट्या होण्याची शक्यता वाढते.

Latest and Breaking News on NDTV

हलका नाश्ता करा | motion sickness prevention tips

रिकाम्या पोटी प्रवास केल्याने मोशन सिकनेस वाढते. प्रवासाला निघण्यापूर्वी हलका आणि पौष्टिक नाश्ता करा.

योग्य सीट निवडा | home remedies for motion sickness: 

शक्य असल्यास नेहमी वाहनाच्या पुढील सीटवर बसा. मागच्या सीटवर बसल्याने गतीची जाणीव जास्त होते, ज्यामुळे मळमळीची समस्या वाढते.

( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
 

ताजी हवा घ्या | motion sickness home treatment: 

खिडकीची काच उघडून बाहेरची ताजी हवा घ्या. यामुळे उलट्यांची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.

लिंबू आणि आल्याचे सेवन | motion sickness remedies: 

लिंबू, आले, पुदिना किंवा च्युइंग गम खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या लवकर शांत होतात.

लवंगचा उपाय | how to prevent vomiting while traveling: 

भाजलेली लवंग बारीक करून डब्यात ठेवा. प्रवासात उलटीसारखे वाटल्यास, ती काळ्या मीठासोबत किंवा साखरेसोबत खा.

मोशन सिकनेस ही काही गंभीर समस्या नाही, पण ती प्रवासाचा आनंद नक्कीच कमी करते. जर तुम्ही प्रवासापूर्वी हलका नाश्ता केला, योग्य सीटवर बसला आणि लिंबू-आल्यासारखे घरगुती उपाय केले, तर हा त्रास बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकतो.

( स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमचे डॉक्टर तसेच संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही. )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com