Mumbai Girl Tara Dhillon Weds Pakistani Businessman Salim: भारत आणि पाकिस्तान या देशातील नागरिकांनी एकमेकांशी केलेल्या लग्नाची नेहमी चर्चा होते. या लग्नात काही तरी गोष्ट खास असते. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचं लग्न आणि हनीमून चर्चेत आहे. त्यांची चर्चा फक्त दोन देशांमधील संबंधांमुळे नाही. तर या लव्ह बर्ड्समध्ये वयाचं अंतर असल्यानंही त्यांची सर्व जण चर्चा करत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईची सुंदरी आणि पाकिस्तानचा उद्योगपती
मुंबईची मुलगी तारा ढिल्लों (Tara Dhillon) आणि पाकिस्तानचे ज्येष्ठ उद्योगपती सलीम गौरी (saleem Gauri) यांच्या लग्नाचा तसंच हनीमूनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. पैसा काहीही करु शकतो, अशी भावना अनेकजण हा व्हिडिओ पाहून व्यक्त करतायत. मुंबईची तारा 55 वर्षांच्या पाकिस्तानी उद्योगपतीच्या प्रेमात पडली. या प्रेमामागे आर्थिक कारण असू शकतं, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. तर काही जण या जोडप्यानं शेअर केलेला व्हिडिओ पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा करत आहेत.
( नक्की वाचा : भर कार्यक्रमात रेखानं मारली होती जया बच्चन यांना मिठी, अमिताभ बच्चनही झाले थक्क, Video )
स्वत:च शेअर केला हनीमूनचा व्हिडिओ
या जोडप्यानं स्वत:च त्यांच्या हनीमूनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमधील त्यांची लाईफ स्टाईल पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईची तारा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीशी संबंधित आहेत. तर सलीम गौरी पाकिस्तानमधील आयटी उद्योजक आहेत. ते नेट सोल कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचा व्यवसाय जगभर पसरलाय.
वेगानं व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून अनेकजण या जोडप्याला ट्रोल करत आहेत. तर काही जणांनी त्यांचं अभिनंदन केलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे या जोडप्याच्या लग्नामध्ये युझर्सनाचा अधिक रस आहे.