जाहिरात

भर कार्यक्रमात रेखानं मारली होती जया बच्चन यांना मिठी, अमिताभ बच्चनही झाले थक्क, Video

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्यातील कथित प्रेम प्रकरणाची नेहमीच चर्चा होते.

भर कार्यक्रमात रेखानं मारली होती जया बच्चन यांना मिठी, अमिताभ बच्चनही झाले थक्क, Video
मुंबई:

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत. अमिताभ आणि रेखा यांच्यातील कथित प्रेम प्रकरणाची नेहमीच चर्चा होते. अर्थात त्यांनी आजवर कधीही परस्परांवरील प्रेमाची जाहीर कबुली दिलेली नाही. अमिताभ बच्चन यांनी जयासोबत लग्न केलं आणि ते टिकवलं. त्यामुळे रेखा आणि जया यांच्यातील संबंधही चांगले नव्हते. सिलसिला या चित्रपटात या तिघांनीही एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी कधीही स्क्रीन शेअर केलं नाही. पण, एका कार्यक्रमात घडलेल्या प्रसंगानं सर्वजण थक्क झाले होते.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हा 2015 मधील एका कार्यक्रमातील किस्सा आहे. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचं नाव पुरस्कारासाठी जाहीर झालं. त्यावेळी रेखा आनंदी झाल्या. त्यांना आनंद लपवता आला नाही. त्यांनी पळत जया बच्चन यांच्या जवळ गेल्या. 2015 मधील स्टार स्क्रीन पुरस्कारात हा प्रसंग घडला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना पिकू सिनेमातील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला होता.  

At First glance I thought it was Edited 😅
byu/Chai_Lijiye inBollyBlindsNGossip

रेखानं मारली जया बच्चन यांना मिठी

अमिताभ बच्चन स्टेजवर पोहोचतात रेखा जया बच्चन यांच्या जवळ गेल्या. नेमकं काय सुरु आहे, हे जया बच्चन यांनाही समजलं नसावं, असं त्यांच्या हावभावावरुन वाटत होतं. त्यानंतर त्या दोघांनीही एकत्र अमिताभसाठी टाळ्या वाजवल्या. त्यावेळी रेखी अत्यंत आनंदी दिसत होत्या. त्यांनी जया बच्चन यांना मिठी मारली. रेखा आणि जया यांना एकाच फ्रेममध्ये पाहून पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच कलाकार आश्चर्यचकित झाले होते. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार? 59 वर्षांच्या अभिनेत्यानं केला खुलासा
भर कार्यक्रमात रेखानं मारली होती जया बच्चन यांना मिठी, अमिताभ बच्चनही झाले थक्क, Video
mumbai-girl-tara-dhillon-married-to-55-years-old-pakistani-rich-businessman-salim-honeymoon-video-viral
Next Article
मुंबईची सुंदरी पडली 55 वर्षांच्या पाकिस्तानी उद्योगपतीच्या प्रेमात! हनीमूनचा Video Viral