VIDEO: खरा तो एकची धर्म! मुस्लिम तरुणाने प्रेमानंद महाराजांसाठी केलं असं काही.. येऊ लागल्या धमक्या

Muslim Youth Pray For Premanand Maharaj Viral Video: मुस्लिम युवकाने प्रेमानंद महाराजांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचा हा व्हिडिओ माध्यमांवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Muslim Youth Pray For Premanand Maharaj Viral Video: सध्या सोशल मीडियावर मथुरा-वृंदावनचे संत प्रेमानंद जी महाराज (Premanand Ji Maharaj) यांच्या तब्येतीबद्दल (Health) अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपूर्ण देशातील त्यांचे अनुयायी चिंतेत असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रेमानंद जी महाराज हे असे संत आहेत, ज्यांना केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम समुदायातील लोकही मोठ्या आदराने मानतात. (Muslim Youth Pray For Premanand Maharaj At Makka) 

प्रेमानंद महाराजांसाठी मुस्लिम तरुणाची प्रार्थना

याच सद्भावाचे दर्शन घडवणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये, एक मुस्लिम तरुण प्रेमानंद जी महाराज यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सौदी अरेबियातील मदिना (Madina) या पवित्र भूमीवर 'दुआ' (प्रार्थना) मागताना दिसत आहे. मुस्लिम युवकाने प्रेमानंद महाराजांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचा हा व्हिडिओ माध्यमांवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या तरुणाचे नाव सुफियान इलाहाबादी (Sufiyan Allahabadi) आहे. सुफियान मदिनाच्या पवित्र मशिदीसमोर उभा आहे. त्याच्या हातात मोबाईल फोन आहे आणि फोनच्या स्क्रीनवर प्रेमानंद जी महाराजांचा फोटो दिसत आहे. "या अल्लाह, प्रेमानंद जी महाराज यांना लवकरात लवकर स्वस्थ कर, जेणेकरून ते पुन्हा लोकांची सेवा करू शकतील, अशी प्रार्थना तो करत आहे. 

व्हिडिओ जोरदार व्हायरल, धमकीचेही फोन 

त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून या कृतीचे कौतुक केले आहे.  दरम्यान, सुफियानने सांगितले की व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या. त्याने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यानंतर त्याला हजारो समर्थनात्मक कमेंट्स मिळाल्या. सुफियानने स्पष्ट केले की तो एका खाजगी कंपनीत काम करतो. अनेक लोकांनी व्हिडिओ हटवण्याची मागणी केली आहे. ज्यावरुन त्याने नाराजी व्यक्त केली. 

Advertisement