आईला वाटलं मी मेलो..., बोर्डाचा पेपर देऊन घरी परतलो; तरुणाला त्या अवस्थेत पाहून कुटुंब हादरलं, काय घडलं?

कधी-कधी आयुष्यात अशा काही रंजक गोष्टी घडतात की हसता हसता डोळेही भरून येतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

My Mom Thought I Was Dead Reddit Post: कधी-कधी आयुष्यात अशा काही रंजक गोष्टी घडतात की हसता हसता डोळेही भरून येतात. Reddit वर शेअर केलेली एक कहाणी अशीच काहीशी आहे. सर्वसाधारणपणे परीक्षेच्या काळात विद्यार्थी जागरण करतात. भूक-तहान बाजूला ठेवून अभ्यास केला जातो. मात्र यंदा झोपेमुळे असं काहीतरी घडलं की कुटुंबातील सदस्यांचा श्वास टांगणीला लागला. 

प्री बोर्डाचं टेन्शन, तीन दिवसात केवळ ४ तासांची झोप (sleep deprivation student)

एका विद्यार्थ्याने  Reddit वर लिहिलंय, त्याचे प्री-बोर्ड एखाद्या ऑलिम्पिकप्रमाणे सुरू होते. फिजिक्स आणि केमिस्ट्रीने डोकं आऊट केलं होतं. तीन दिवसात केवळ चार तास झोप घेता आली होती. सातत्याने अभ्यास, तणाव आणि धावपळीनंतर शुक्रवारी परीक्षा देऊन घरी पोहोचलो आणि सरळ बेडवर आडवा झालो. 

२८ तास कोम्यात गेल्यासाठी झोप, कुटुंबाचं टेन्शन वाढलं  (Stundent burnout school story)

तो दुपारी २ वाजता झोपला आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता उठला. कुंटुंबातील व्यक्ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र विद्यार्थी काहीच प्रत्युत्तर देत नव्हता. आईला काहीतरी वाईट घडल्याचं लाटलं. तिने घाबरुन मुंबईत बाबांना फोन केला. बाबांनी फॅमिली डॉक्टरला घरी पाठवलं. 

Advertisement

नक्की वाचा - Trending Reel : ट्रेंडिंग व्हिडिओमधील महिला अशा का नाचतात? आनंद की दु:ख काय आहे कारण?

डॉक्टर आले, हाताची नस पाहिली अन् हसू लागले...

डॉक्टरने विद्यार्थ्याला तपासलं. ते म्हणाले, काहीही झालेलं नाही. मुलाने नीट झोप घेतली नसेल त्यामुळे तो सलग झोपून आहे. २८ तासांनी मुलगा उठला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्याला हा सर्व प्रकार मजेशीर वाटला. तर दुसरीकडे आईचा जीव टांगणीला लागला होता. 

आज प्रत्येक विद्यार्थी गुणांच्या स्पर्धेत स्वत:ला झोकून देत आहे. तो शारिरीक मर्यादा मानत नाही. डॉक्टर सांगतात, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ७-८ तास झोप आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. मेमरी कमकुवत होते आणि स्ट्रेस वाढतो. गुण नंतर...तुमची प्रकृती आधी महत्त्वाची.  

Advertisement