Navneet Rana: लग्नाचा वाढदिवस अन् राणा दाम्पत्य पोहोचलं 'या' खास ठिकाणी, Video होतोय Viral, कमेंटचा ही पाऊस

हातात हात अन् एकमेकांची दोघांना साथ असंच त्यांचे व्हिडीओ पाहील्यानंतर म्हणावे लागेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने २०११ मध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत लग्न केले होते
  • या वर्षी २ फेब्रुवारी रोजी त्यांचा लग्नाचा पंधरावा वाढदिवस हिमालयातील बर्फाच्छादित परिसरात साजरा केला
  • नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ट्रिपचे व्हिडीओ शेअर केले आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य नेहमीच चर्चेत असतं. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चत आलं होतं. अमरावती महापालिकेची निवडणूक त्यांच्या भोवतीच फिरत होती. नवनीत राणांनी तर भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत आपले पती रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार ही केला. आता निवडणूक झाली आहे. आता या सर्व गदारोळा पासून लांब हे दाम्पत्य गेलं आहे. निमित्त आहे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. सतत लोकांच्या गराड्यात राहणारे हे दाम्पत्य सध्या वेगळ्याच जगात वावरत आहे. त्यांचे व्हिडीओ ही व्हायरल झाले आहेत. अनेक लोकांनी ते पाहीले आहेत. शिवाय त्यावर कमेंट ही केल्या आहेत. 

अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर यांनी आमदार रवी राणा यांच्या सोबत 2011 साली लग्न केले होते. बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी लग्न केले होते. 2 फेब्रुवारी ला हा लग्न सोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाला आता पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस 2 फेब्रुवारीला झाला. हा खास क्षण या दोघांनी एकत्रीत अमरावती पासून लांब हिमालयाच्या बर्फाच्छादीत वातावरणात घालवला. यावेळचे काही व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

नक्की वाचा - Sunetra Pawar: अर्थ खातं नाही पण 'या' दोन जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांकडे कायम, शासन निर्णय ही निघाला

हे व्हिडीओ कश्मीर किंवा हिमाचल प्रदेशातील असावेत असा अंदाज आहे. दोघे ही बिंदास पणे फिरताना दिसत आहेत. हाता हात घातले आहेत. रस्त्याने फेरफटका मारताना ही दिसत आहे. नेहमी साडीत दिसणाऱ्या नवनीत राणा यावेळी मात्र मॉडर्न लुकमध्ये दिसत आहेत. तर रवी राणा यांनी ही आपला पेहराव बदललेला दिसतोय. दुसऱ्या एका व्हिडीओत ते स्नो फॉल मध्ये फिरताना दिसत आहेत. स्नो फॉलचा आनंद घेताना त्या दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहीले गेले आहे. त्याचा फेसबुकवरचा एक व्हिडीओ तर वन मिलीयनच्या जवळ पोहोचला आहे. या दाम्पत्याला त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा ही दिल्या आहे.  

Advertisement

हातात हात अन् एकमेकांची दोघांना साथ असंच त्यांचे व्हिडीओ पाहील्यानंतर म्हणावे लागेल. त्यांना अनेकांनी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी टिका ही केल्याच्या कमेंट आहेत. त्यावरून ही त्यांच्या समर्थकांनी अशा लोकांना सुनावले आहे. पण सध्या दोघे ही निसर्गाच्या सानिध्यात आहेत. सतत काम आणि जनतेच्या गराड्यात असलेले हे नेते सध्या सर्वांपासून दुर आहेत. आपल्या खाजगी जिवनाचा आनंद लुटत आहेत. सध्या त्यांच्या या ट्रिपची चर्चा ही सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.   

Advertisement