Online Dating Scam Viral News: दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही प्राचीन काळातील म्हण आजच्या हायटेक जगातही समर्पक आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा प्रत्य येत असतो. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) 57 वर्षांच्या एनेट फोर्ड (Annette Ford) या महिलेल्या असंच ऑनलाईन प्रेम (love online) इतकं महाग पडलं की त्यामध्ये त्यांनी आयुष्यभराची कमा गमावली. दोन वेगवेगळ्या ऑनलाईन डेटिंग स्कॅममध्ये त्यांनी एकूण 7,80,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (जवळपास 4.3 कोटी रुपये) गमावले. त्यामुळे त्या आता बेघर झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
एनेट फोर्ड यांचं 2018 साली 33 वर्ष जुनं लग्न मोडलं. त्यामुळे त्यांना एककी वाटत होती. त्यांनी जोडीदाराच्या शोधासाठी अनेक ऑनलाईन डेटिंग साईट (online dating site) जॉईन केल्या. यामध्ये त्यांची भेट विल्यमशी झाली. काही महिने ऑनलाईन डेटिंग केल्यानंतर त्यानं आपला कौलालंपूरमधील ऑफिसच्या बाहेर पाकिट चोरीला गेल्याचं फोर्ड यांना सांगितलं.
त्यानं सुरुवातीला एनेटकडून 5,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स मागितले. त्यानंतर हळू-हळू हॉस्पिटलचं बिलं, हॉटेलमधील राहणे, कर्मचाऱ्यांची पगार या नावावर लाखो रुपये घेतलेय एनेटकडून त्यानं एकूण 3,00,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स घेतले. त्यामध्ये त्यांचे संपूर्ण निवृत्ती वेतन समाप्त झाले.
( नक्की वाचा : Dombivli '65 बेकायदा इमारतीमध्ये घोटाळा करणाऱ्याला पोलिसांचे संरक्षण', थेट आयुक्तांसमोरच गंभीर आरोप )
पहिल्यांदा झालेल्या फसवणुकीनंतरही एनेटला काही धडा मिळाला नाही. त्यांची 2022 मध्ये फेसबुकवर नेल्सनची भेट झाली. त्यानंही त्यांच्या आधी मैत्री वाढवली आणि नंतर विश्वास संपादन केल्यानंतर पैसे मागितले. नेल्सननं पहिल्यांदा एफबीआयच्या मित्राला मदत करायची आहे, असं सांगून 2,500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स मागितले. एनेटनं बिटकॉईन एटीएमच्या माध्यमातूनही पैसे पाठवले.
नेल्सनं आपण अॅम्स्टरडॅमचा असल्याचं सांगितलं होतं. एनेटनं त्याला भेटायला दोनदा अॅम्स्टरडॅमला गेली. त्यावेळी तिला तिथं कुणी नसल्याचं लक्षात आलं. यावेळी तिनं घराच्या विक्रीमध्ये 2,80,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स गमावले.
दोनदा फसवणूक झाल्यानं एनेट आता बेघर झाली आहे. ती सध्या अपंगत्व आधार पेन्शनसाठी अर्ज करत आहे 'मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काम करण्याच्या स्थितीत नाही. मला खूप लाज वाटते,' अशी भावना तिने व्यक्त केली आहे.