जाहिरात

Viral Video 'आई कशी होणार?' प्रसूतीच्या वेदनेत असलेल्या सुनेची सासूकडून थट्टा; भयंकर प्रकाराने डॉक्टरही हादरले

प्रसूती वेदनांनी त्रस्त झालेल्या आपल्या सुनेला (Daughter-In-Law) एका वृद्ध सासूने लेबर रुममध्ये (Labour Room) चांगलेच सुनावले आणि तिची चेष्टा (Mocking) केली.

Viral Video 'आई कशी होणार?' प्रसूतीच्या वेदनेत असलेल्या सुनेची सासूकडून थट्टा; भयंकर प्रकाराने डॉक्टरही हादरले
Viral Video:  या माणुसकीहीन वागणुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई:

Prayagraj Hospital Viral Video:  उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज (Prayagraj) येथील एका हॉस्पिटलमधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. प्रसूती वेदनांनी त्रस्त झालेल्या आपल्या सुनेला (Daughter-In-Law) एका वृद्ध सासूने लेबर रुममध्ये (Labour Room) चांगलेच सुनावले आणि तिची चेष्टा (Mocking) केली. या माणुसकीहीन वागणुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, सासूच्या क्रूर वागणुकीवर जोरदार टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीहून (Varanasi) एक कुटुंब डिलिव्हरीसाठी प्रयागराजमधील एका हॉस्पिटलमध्ये आले होते. गर्भवती महिला प्रसूती वेदनेने रडत होती आणि डिलिव्हरीसाठी तयारी सुरू होती, तेव्हा कुटुंबातील वृद्ध सासू नैसर्गिक प्रसूतीचा (Natural Delivery) आग्रह धरत होती. दुसरीकडे, काही अडचणींमुळे महिलेचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य सिझेरिअन सेक्शनचा (Caesarean Section) विचार करत होते.

( नक्की वाचा : Dharmendra Health : धर्मेद्रसाठी फॅनच्या डोळ्यात पाणी! चाहत्याचं प्रेम पाहून 'धरम पाजी'ही होतील भावुक, VIDEO )
 

सासूबाईंनी काय केलं?

स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) डॉ. नाझ फातिमा (Dr. Naaz Fatima) यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सासू तिच्या सुनेची वेदना पाहून तिची चेष्टा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सासू सुनेला दरडावून म्हणताना ऐकू येत आहे, "शांत बस, नाहीतर मी तुझं तोंड फोडेन. तू जर अशीच रडत राहिलीस, तर आई कशी होणार?" एवढेच नव्हे तर, जेव्हा सून तिच्या पतीचा हात धरून वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा सासूने सुनेला पतीचा हात सोडण्यास सांगितले. कुटुंबातील इतर लोक सासूला शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण ती ऐकत नव्हती.

डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता

ज्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नाझ फातिमा यांनी हा व्हिडिओ शेअर केला, त्यांनी या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रसूतीच्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत (Stressful Situation) कुटुंबातील सदस्यांनी गर्भवती महिलेला प्रेम आणि काळजी देणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. डॉ. फातिमा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, "अशा वेळी प्रेमाने बोलले पाहिजे."

सोशल मीडियावर संताप

हा व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर या घटनेवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. अनेक वापरकर्त्यांनी सासूच्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध केला. त्याचबरोबर, डिलिव्हरी रुममध्ये पती आपल्या पत्नीचा बचाव करताना दिसला नाही, म्हणून अनेक युजर्सनी पतीवरही टीका केली.

( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
 

एका युजरने लिहिले, "गर्भवती महिलेचा अपमान होत असताना कोणीही काही बोलले नाही, हे पाहणे कठीण आहे. प्रत्येक वडीलधारी व्यक्ती आदरास पात्र नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केवळ वय जास्त असले म्हणजे माणूस शहाणा किंवा दयाळू नसतो." तर, दुसऱ्या एका युजरने पतीवर निशाणा साधत म्हटले, "मला इथे सासूसोबतच एक समस्याग्रस्त पती दिसतो, जो पत्नीसाठी उभा राहू शकला नाही. तो पती म्हणून पूर्णपणे अपयशी ठरला आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com