Pune Rameshwaram Cafe Free Offer Viral Video: दाक्षिणात्य खाद्य संस्कृती देशभरात पोहोचवणारे ठिकाण म्हणजे रामेश्वरम कॅफे. बंगळुरुमधील हा प्रसिद्ध कॅफे दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ म्हणजेच इडली, डोसासारख्या भन्नाट डिशेससाठी ओळखला जातो. आता बंगळुरुमधील हा प्रसिद्ध कॅफे पुण्यातही सुरु होणार आहे. 19 डिसेंबरपासून हा कॅफे सुरु होणार असून त्याआधी त्यांनी कोणताही पदार्थ अगदी मोफत खाण्याची भन्नाट ऑफरही ठेवली आहे.
प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेची फ्री ऑफर...
बेंगळुरूचे सर्वात प्रसिदध रामेश्वरम कॅफे, 19 डिसेंबर 2025 पासून पुण्यात सुरु होत आहे. पुण्यातील विमाननगर भागात रामेश्वरम कॅफेची नवीन फ्रेंचायची सुरु होत आहे. 19 डिसेंबरला रामेश्वरम कॅफे अधिकृतपणे पुणेकरांच्या सेवेत सुरु होणार आहे. त्याआधी कॅफे चालकांनी अशी काही भन्नाट ऑफर ठेवली की पुणेकरांनी याठिकाणी तुफान गर्दी केली आहे.
पुणेकरांची तुफान गर्दी
16 डिसेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान सायंकाळी 4.30 ते 12 यावेळेत रामेश्वरम कॅफेमध्ये कोणताही पदार्थ अगदी मोफत मिळणार आहे. ही ऑफर पुणेकरांना समजली अन् कॅफेत तुफान गर्दी झाली. कॅफेच्या बाहेर खवय्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कॅफेची दाक्षिणात्य मंदिरासारखी सुंदर रचना, त्यावर असलेला भलामोठा डोसा सर्वांचेच लक्ष वेधत आहे.
रामेश्वरम् कॅफे पुणे 😵 pic.twitter.com/WHTXGyQJib
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) December 18, 2025
दरम्यान, बंगळुरुमधील राघवेंद्र राव आणि दिव्या राघवेंद्र राव या दांपत्याने रामेश्वरम कॅफे सुरु केला. स्वच्छता, फास्ट सर्विस आणि दाक्षिणात्य खाद्यपदार्थांसाठी हा कॅफे विशेष ओळखला जातो. अगदी बॉलिवूड कलाकारांपासून ते दिग्गज राजकारण्यांपर्यंत सर्वच जण या कॅफेचे चाहते आहेत. आता हा प्रसिद्ध कॅफे पुण्यात सुरु होत असल्याने पुणेकरांनाही दाक्षिणात्य पदार्थांची मेजवाणी मिळणार आहे.
नक्की वाचा >> Trending Video सर्वात भयंकर! समुद्राचं पाणी अचानक का होतंय लाल? यामागचं कारण वाचून धक्काच बसेल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world