Zombies In Pune Viral Video: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचे एक विदारक दृश्य समोर आले आहे. नरपतगिरी भागात एका तरुणाचा 'झोंबी' अवस्थेतील व्हिडिओ समोर आला असून, यामुळे पुण्यात ड्रग्ज माफियांचे जाळे पसरले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे.
Jalgaon News: जळगावमध्ये ACBचा 'सर्जिकल स्ट्राईक', टीप मिळताच सापळा अन् रंगेहाथ पकडलं, कारवाईने खळबळ
झोंबीचा पुण्यात शिरकाव
गेल्या काही दिवसांपासून झोंबी ड्रग्ज या नावाची जोरदार चर्चा होत आहे. मुंबईसह विविध शहरात तरुणांच्या व्हायरल व्हिडिओमुळे झोंबी ड्रग्ज चर्चेत आले होते. अशातच आता पुणे शहरातही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पुण्यातही झोंबीची एन्ट्री झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यातील नरपतगिरी चौक परिसरात एक तरुण तब्बल दोन तास 'झोंबी'सारख्या सुन्न अवस्थेत उभा असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वी नरपतगिरी चौकात एक तरुण भर उन्हात कोणतीही हालचाल न करता बर्फासारखा गोठलेल्या अवस्थेत उभा होता. सुरुवातीला हा प्रकार एखाद्या रीलसाठी केलेला स्टंट असावा, असे स्थानिकांना वाटले. मात्र, बराच वेळ उलटूनही त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल न दिसल्याने संशय बळावला. काही वेळाने त्याने अतिशय विचित्र आणि अनियंत्रित हालचाली करण्यास सुरुवात केली. हा प्रकार 'झोंबी ड्रग्ज'च्या नशेतूनच घडल्याची चर्चा आता रंगू लागली असून, अमली पदार्थ विरोधी पथकाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
West Bengal : PM मोदींशी मैत्री, तरीही सत्तेच्या खुर्चीला लाथ; मिथुन चक्रवर्तींनी पद नाकारण्याचं कारण उघड
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दोन तास रस्त्यावर एकाच जागी उभा होता. भर उन्हात त्याचे असे उभे राहणे आणि त्यानंतरच्या विचित्र हालचाली पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी मीरा-भाईंदर परिसरात अशाच प्रकारे एक तरुण अर्धनग्न अवस्थेत 'झोंबी'सारखा वागताना आढळला होता. त्याच प्रकारची पुनरावृत्ती पुण्यात झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, NDTV मराठी या व्हिडिओची पुष्ठी करत नाही.