मंगेश जोशी, जळगाव:
Jalgaon Bribe Case: जळगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता 5 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. योगेश अहिरे असे लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याचे नाव असून ठेकेदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरेने तक्रारदाराकडे 18 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची टीप मिळताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले.
West Bengal : PM मोदींशी मैत्री, तरीही सत्तेच्या खुर्चीला लाथ; मिथुन चक्रवर्तींनी पद नाकारण्याचं कारण उघड
जळगावमध्ये मोठी कारवाई; ५ लाखांची लाच घेताना अटक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मोठी कारवाई केली. प्रलंबित बिलाच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या शाखा अभियंता योगेश अहिरे याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराचे कामाचे पैसे काढण्यासाठी योगेश अहिरे याने तब्बल १८ लाख रुपयांची मागणी केली होती. कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. तडजोडीअंती १५ लाख रुपयांचा आकडा निश्चित झाला होता. आज पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अहिरे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर एसीबीने आरोपीची कारही जप्त केली असून त्याच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या कारवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
( नक्की वाचा : कोर्टात गायलं गाणं अन् न्यायाधीशांनीच काढलं तिकीट!PM मोदी ज्यांच्या पाया पडले ते 97 वर्षांचे माखनलाल सरकार कोण? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world