Viral Video : जिममध्ये किती किलो वजन उचलता? प्रसिद्ध बॉडीबिल्डरसोबत घडली सर्वात भयंकर घटना

28 वर्षांच्या बॉडीबिल्डर पावरलिफ्टरचा मृत्यू झाला. एका स्पर्धेदरम्यान या पावरलिफ्टरने 350 किलो वजन उचलले आणि  त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार..पाहा व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
Read Time: 2 mins
Body Builder Shocking Video

Body Builder Video Clip Viral :  पंजाबमधील लुधियाना शहरात 28 वर्षांच्या बॉडीबिल्डर पावरलिफ्टरचा मृत्यू झाला. एका स्पर्धेदरम्यान या पावरलिफ्टरने 350 किलो वजन उचलले आणि  त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरु झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुखवीर सिंह (28) असं या प्रसिद्ध बॉडीबिल्डरचं नाव आहे. तो पंजाबच्या नवांशहरमधील बलाचौरचा रहिवासी होता, पण व्यवसायामुळे तो लुधियानामध्ये राहत होता.

याबाबत सविस्तर वृत् असं की, बलाचौरच्या बल्लोवाल भागात मेहंदीपूर रोडवर त्याची एक जिम आहे. सुखवीर सिंह रविवारी लुधियानाच्या सलेम टाबरी भागात पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाला होता. सुखवीर सिंहने 150 किलो वजनाने बेंच प्रेसचा व्यायाम केला. त्यानंतर त्याने 350 किलो वजन उचलून डेडलिफ्ट राउंड जिंकला. पण स्पर्धेनंतर काही वेळातच सुखवीरच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.

सहकारी आणि इतर स्पर्धकांना मोठा धक्का बसला 

तो स्वत:ला सावरायचा प्रयत्न करत होता. पण कारमध्ये बसण्याआधीच तो बेशुद्ध झाला आणि खाली पडला. त्यानंतर सहकाऱ्यांमध्ये आणि इतर स्पर्धकांना मोठा धक्का बसला. त्यांनतर त्याला लुधियानातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने (कार्डियाक अरेस्ट) त्याचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक

Advertisement

पावरलिफ्टर आणि गोल्ड मेडलिस्ट

सुखवीरचा ‘सुख फिटनेस' या नावाने इंस्टाग्राम अकाउंट आहे. या अकाउंटवर त्याने 800 पेक्षा जास्त पोस्ट टाकल्या आहेत. त्याचे 55 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सुखवीर फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करायचा. पावरलिफ्टर आणि गोल्ड मेडलिस्ट असल्याचं त्याने त्याच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये म्हटलं आहे. 

नक्की वाचा >>Shocking News : पाकिस्तान नाही, आता 'या' मुस्लिम देशात सतत गायब होतायत हिंदू, कारण जाणून हादराच बसेल 

सुखबीर सिंह मूळचा बलाचौरचा रहिवासी होता. बॉडीबिल्डिंगसोबत तो अॅथलेटिक्सचा खेळाडूही होता. लुधियानामध्ये पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो पोहोचला होता. या प्रकरणात बलाचौरमधील लोकांनी सांगितले की सुखवीर सिंहचे गावात स्वतःचे जिम होते. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तो नेहमीच मार्गदर्शन करायचा. 

Advertisement