शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यावेळचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण त्यातला एक व्हिडीओने सर्वांनीचेच लक्ष वेधले होते. तो म्हणजे एक तरुणी पोलिसांच्या व्हॅन समोर उभी होती. त्या व्हॅनमध्ये आंदोलन करणाऱ्या मुलांना डांबलं होतं. जोपर्यंत मुलांना सोडणार नाही तोपर्यंत व्हॅन समोरून बाजूला होणार नाही अशी भूमीका या तरुणीने घेतली होती. ती तरुणी म्हणजे रिया अहिर. तिनेच NDTV मराठी सोबत बोलताना त्यावेळी नक्की काय झालं याचा थरार सांगितला आहे. यावेळी बोलताना तिने सांगितले की त्यावेळी जे काही झाले ते मनापासून आणि आतून झाले होते असं तिने स्पष्ट केलं.
रियाने सांगितले की ज्यावेळी हे आंदोलन सुरू होते त्यावेळी ती काही मित्रांची वाट पाहात उभी होती. त्याच वेळी काही घोषणा तिने ऐकल्या. त्यानंतर मी स्वत:ला रोखू शकले नाही. मी त्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी पाहीलं की एका पोलिस व्हॅनमध्ये गुराढोरां प्रमाणे मुलांना कोंबलं होतं. ते चित्र अतिशय वाईट होतं. त्याच वेळी मी त्या व्हॅन समोर उभी राहील. त्यानंतर पोलिसांना थेट विचारणा केली, या मुलांना ताब्यात घेण्याचा मेमो तुमच्याकडे आहे का? हा प्रश्न विचारल्यानंतर ते पोलिस माझ्याकडे पाहातच राहीले. ते काहीच बोलले नाही. माझा अधिकार काय आहे हे मला माहित होतं. त्यामुळेच पोलीस त्यावेळी काहीच बोलले नाहीत असं रिया म्हणाली.
पोलिस त्यावेळी जे काही करत होते ते चुकीचे होते. त्याच वेळी त्या व्हॅनमधून एका मुलीला बाहेर काढण्याचा मी प्रयत्न केला. पण त्याच वेळी पोलिसांनी ती व्हॅन सुर केली. ती माझ्या दिशेन पुढे येत होती. पण मी गाडी समोरून बाजूला झाली नाही. ती मुलगी बाहेर पडेल म्हणून मी तिला बाहेर काढण्याचा नाद सोडला. मी त्या व्हॅन समोर उभीर राहीली. व्हॅन सुरू करून हळुहळू पुढे येत होती. पण मी त्यावेळी बाजूला झाली असती तर त्या मुलांवर तो अन्याय झाला असता. एक नागरीक म्हणून मी फेल झाली असती. काही करून मला त्या मुलांना सोडवायचं होतं. त्यामुळे मी गाडी समोरच उभी राहीली. शहीद झाले तरी चालेल पण बाजूला हटणार नाही असं मी ठरवलं होतं असं ही रियाने सांगितलं.
ज्यावेळी हे सर्व सुरू होतं त्यावेळी माझ्या मागे काय सुरू आहे हे मला माहित नव्हतं. तिथे किती माणसं आहेत. कोण माझा फोटो काढत आहे. कोण माझा व्हिडीओ काढत आहे हे मला माहित नव्हतं. त्यावेळी मला फक्त त्या मुलांना सोडवायचं होतं. काही वेळाने अजून काही लोक तिथे आले. त्यांनी मला पाठिंबा दिला. लोक एकत्र आले. शेवटी पोलिसांना त्या मुलांना सोडावं लागले. मी समाधानी होते. या आंदोलनाला माझा असा ही हातभार लागला. सरकारने आंदोलन करणाऱ्या मुलांसोबत संवाद साधला पाहीजे असं ही ती म्हणाली. राजीनाम नाही तर चर्चा केली पाहीजे असंही तिने सांगितले. रियाचे वडील हे निवृत्त आर्मी ऑफीसर आहेत. तर तीचे काका आणि भाऊ ही आर्मीत आहे. त्यामुळे लढणे हे आपल्या रक्तात असल्याचं तीने यावेळी बोलताना सांगितले.