जाहिरात

Viral Video: तर आताचा सोडा...आंदोलक विद्यार्थ्यांसाठी थेट पोलीस व्हॅनसमोर उभी राहणारी 'ही' तरुणी आहे तरी कोण?

Viral Video: मुंबईत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीने थेट पोलीस व्हॅन अडवून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेली आणि पोलिसांशी भिडणारी तरुणी आहे तरी कोण? सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Viral Video: तर आताचा सोडा...आंदोलक विद्यार्थ्यांसाठी थेट पोलीस व्हॅनसमोर उभी राहणारी 'ही' तरुणी आहे तरी कोण?
"Viral Video: मुंबई पोलिसांची व्हॅन एकटीने रोखणारी ती तरुणी कोण?"
मुंबई:

Rhiya Ahir Viral Video: दिल्लीच्या जंतरमंतरसोबतच मुंबईतही विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक तरुणी मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहिलेली दिसत आहे. खूप प्रयत्नांनंतरही ती मागे हटली नाही आणि तिने पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडवले. पोलीस व्हॅनसमोर निडरपणे उभी असलेली ही मुलगी कोण आहे? तिच्याबाबत माहिती जाणून घेऊया...

Latest and Breaking News on NDTV

मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहीर कोण आहे?

मुंबईत पोलीस व्हॅनसमोर निडरपणे उभ्या राहिलेल्या मुलीचे नाव रिया अहीर आहे. ती एक अभिनेत्री (Actor), मॉडेल आणि उद्योजिका (Entrepreneur) आहे. रिया सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर आपले मत ठामपणे मांडत असते. 'रियासत' (Rhiyasat) नावाचा तिचा स्वतःचा एक क्लोदिंग ब्रँड आहे. रियाला डान्सचीही खूप आवड आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये तिचे नुकतेच आलेले 'दिलबरा' या गाण्याचाही समावेश आहे, जे फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज झाले होते.

Latest and Breaking News on NDTV

देवावर श्रद्धा, आजकाल इंटरनेटवर व्हायरल

रिया स्वभावाने धार्मिक आहे, तिची देवावर खूप श्रद्धा आहे. ती रोज मंदिरात जाऊन देवाची पूजा-अर्चा करते. रिया सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पोलीस व्हॅनसमोर निडरपणे उभी आहे. रियाने एकटीनेच पोलिसांना व्हॅन पुढे नेण्यापासून रोखले. या व्हॅनमध्ये आंदोलक विद्यार्थी होते, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रियाने एकटीनेच पोलिसांना त्यांना घेऊन जाण्यापासून रोखले.

(नक्की वाचा: VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

पोलीस व्हॅनसमोर निडरपणे उभी राहिली

27 वर्षीय मॉडेल रिया अहीरने असा विचारही केला नसेल की ती बुधवारी (22 जुलै) शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनेल. रिया दादरच्या कोहिनूर स्क्वेअरवरून शिवाजी पार्कच्या दिशेने जात होती. तेव्हा तिने पाहिले की पोलिसांच्या एका व्हॅनमध्ये ताब्यात घेतलेले आंदोलक भरलेले आहेत. ती वेगाने व्हॅनच्या दिशेने गेली आणि तिच्या समोर उभी राहिली. पोलिसांसोबत तिची जोरदार बाचाबाचीही झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिला सांगितले की ते पुढे जाऊन या लोकांना सोडून देतील, यावर रिया म्हणाली की सोडायचेच आहे तर आताच सोडा. ती पोलिसांसमोर ठामपणे उभी राहिली. अखेर रियाचे प्रयत्न यशस्वी झाले आणि पोलिसांनी सर्व आंदोलकांना सोडून दिले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रियाचे भरभरून कौतुक होत आहे.

Latest and Breaking News on NDTV

आंदोलकांना एकटीने सोडवले

पोलीस आपले काम जबाबदारीने करत नाहीत, असा रियाने आरोप केला आहे. जर ते असे करणार नसतील तर आपल्याला आपल्या नागरिकांची जबाबदारी स्वतःच उचलावी लागेल, असेही ती म्हणालीय. रिया यादवने मीडियाला सांगितले की,"ती दलितही नाही, ओबीसीही नाही आणि तिचे वडील शेतकरीही नाहीत. तरीही ती विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवेल, कारण त्यांच्यासोबत झालेली मारहाण चुकीची होती. तसंच तिला तिच्या समुदायाचा आणि संस्कृतीचा खूप अभिमान आहे".

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com