Funny Video : 'अभ्यास केला नाही तर काय होईल?', चिमुकलीनं उत्तर देताच शाळेतील मॅडम कोमात अन् विद्यार्थी जोमात

जाहिरात
Read Time: 2 mins
School Students Funny Video
मुंबई:

Children Funny Answer To School Teacher : लहानपणापासूनच आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवली जाते की, अभ्यास केला, शिक्षण घेतलं तर महान व्यक्ती बनाल. खट्याळपणा, मस्ती केली तर करिअर संपून जाईल. त्यामुळे मोठ्या व्यक्तींनी बालपणी अनेकांना मार्गदर्शन केलं असेलच. जसं की..अभ्यास केल्यावरच तुमचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. त्यामुळेच तुम्ही जीवनात काहीतरी चांगलं करू शकता. 

शाळा असो किंवा घर, प्रत्येक ठिकाणी लहान मुलांना हेच सांगून भीती दाखवली जाते की, जर तुम्ही चांगल्याप्रकारे अभ्यास केला नाही, तर भविष्यात तुमच्यासोबत काय होणार?..पालकांकडून आपल्या मुलांना अशाप्रकारचं मार्गदर्शन नेहमीच केलं जातं. अशातच शाळेतील एका मुलाचा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

नक्की वाचा >> हा काय प्रकार! सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला दिली दिशाभूल करणारी माहिती, लॉटरी धारकांची झाली फसवणूक

व्हिडीओत पाहू शकता की, टीचर क्लासमध्ये असलेल्या मुलांना उभी करते आणि त्यांना विचारते की,जर अभ्यास केला नाही तर काय होईल? यावर लहान मुलं असं काही उत्तर देतात, जे ऐकून तुम्हीही लोटपोट हसल्याशिवाय राहणार नाहीत. मुलांनी असं उत्तर दिलं, जे त्यांना घरी असताना कोणतरी नक्कीच सांगितलं असावं..सर्वात आधी एक मुलगा उभा राहतो आणि उत्तर देतो, जर अभ्यास केला नाही, तर दुबईला जाऊ शकणार नाही. दुसरा मुलगा म्हणतो, अभ्यास केला नाही तर आपली बुद्धी काम करणार नाही.तिसरी मुलगी खूप प्रक्टिकल उत्तर देते, अभ्यास केला नाही तर पैसे कमावता येणार नाही.असं केल्यानं सर्व मुले त्यांची उत्तर अतिशय मजेशीरपणे देतात.

इथे पाहा शाळेतील मुलांचा मजेशीर व्हिडीओ

एका मुलीनं तर असं उत्तर दिलं की, अभ्यास नाही केला तर मोठे होणार नाही. तसच अन्य एका मुलाचं उत्तर ऐकून सर्व विद्यार्थी खूप हसतात. जेव्हा तो म्हणतो, अभ्यास नाही केला तर मम्मी थप्पड मारेल. @theshristibhardwaz नावाच्या यूजरने मुलांचा हा फनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2.3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय,मम्मी थप्पड मारेल, हे वैयक्तिक उत्तर होतं. दूसऱ्या एकाने म्हटलं, प्रत्येक मुलाच्या तोंडी हे उत्तर सूट करतं. 

Advertisement

नक्की वाचा >> बहिणीचं लफडं समजताच भावाची सटकली! अख्ख्या कुटुंबाला दिली भयंकर शिक्षा..प्रियकराचाही खून केला अन्..