मानसी पिंगळे, प्रतिनिधी
Online Dating Risk: सध्याचं युग डिजिटल आहे. या डिजिटल युगात डेटिंग ॲप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे डेटिंग ॲप्स केवळ शहरांपुरते मर्यादित नसून, खेड्या-पाड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्याच्या आधारावर काहींना आपला जोडीदार मिळत आहे, तर काहींना इथं तासन् तास घालवूनदेखील निराशा सहन करावी लागते. कित्येक युजर्स या डेटिंग ॲप्समधील लाइक, स्वाईप, टॅपिंगच्या चक्रामध्ये अडकतात. या ॲप्सचा वापर वाढलाय, तसंच त्यामधील गुन्हेगारीचेही प्रमाणही वाढले आहे. मुख्यतः कॉलेजच्या मुलांना या ॲपमुळे जास्त धोका आहे. तुम्हीही ऑनलाईन डेटिंगच्या विश्वात पाऊल ठेवणार असाल तर, त्यामधील सुरक्षेसाठी ही सप्तपदी लक्षात ठेवा.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिली धोक्याची घंटा
डेटिंग ॲप्सवर लोक प्रेम, जोडीदार शोधण्यासाठी येतात. एखाद्याच्या प्रोफाइलवर उजवीकडे स्वाइप करणे म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला आवडली, असा अर्थ होतो आणि त्याही व्यक्तीला तुम्ही आवडलात, तर तुम्हाला आपापसांत संवाद साधता येतो. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती न आवडल्यास त्याला लेफ्ट स्वाइप केले जाते. या ॲपमध्ये समोरच्या व्यक्तीने स्वतःबद्दल काहीही न सांगता वैयक्तिक माहिती विचारली तर ती पहिली धोक्याची घंटा आहे.
संपूर्ण विश्वास नको
कोणत्याही व्यक्तीची ऑनलाईन ओळख झाल्यानंतर त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवू नका. त्यानं सांगितलेल्या गोष्टी पडताळून पाहा. त्यानं दिलेल्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका.
( नक्की वाचा : किस-किसको प्यार करूं ... बायको आणि 4 गर्लफ्रेंडसह एकाच सोसायटीत राहत होता तो, आणि एका दिवशी...)
जवळीक टाळा
बऱ्याचदा सोशल मीडियावर बोलताना लोक एकमेकांकडे सहज आकर्षित होतात. अशा परिस्थितीत, जरी एखादी व्यक्ती वारंवर लग्नासाठी, भेटण्यासाठी मागे लागत असेल तर ते तिथेच टाळा. ऑनलाइन जोडीदाराशी नोकरी किंवा करिअरबद्दल मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे त्यामुळे त्या विषयांवर लक्ष द्या. यादरम्यान फक्त तुमच्या पार्टनरला त्यांच्या करिअरबद्दलच विचारू नका, तर तुमच्या करिअर आणि नोकरीशी संबंधित माहितीही पार्टनरसोबत शेअर करा. तुमची मते आणि ते त्याचे मत या दोन्ही गोष्टी विचारात घ्या.
घाई टाळा
ऑनलाइन जोडीदाराचा शोध संपल्यावर अनेकदा प्रेमात घाई केली जाते. ज्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतात. अशा परिस्थितीत, ऑनलाइन भागीदारावर त्वरित विश्वास ठेवणे टाळा. त्याचबरोबर लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय जोडीदाराला काही काळ डेट केल्यानंतरच घ्या. त्याच वेळी, डेटिंग दरम्यान जोडीदारास व्यवस्थित जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.
न्यूड फोटो मागणे
एखादी व्यक्ती तुमचे नग्न अवस्थेत फोटो मागितल्यास सरळ नकार द्या. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून हे फोटो शेअर केले तर त्या फोटोंचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सावध रहा.
बायो आणि फोटो नसलेले प्रोफाइल
बायो (प्रोफाईल कर्त्याची माहिती) आणि फोटो नसलेल्या प्रोफाइलना शक्यतो टाळा. काहीजण बायो आणि फोटो न टाकता प्रोफाइल वापरतात. हे प्रोफाइल फसवी असू शकतात.
( नक्की वाचा : भयंकर! शूटिंग दरम्यान सिहांच्या जबड्यात सापडली होती अभिनेत्री, 'या' प्रकारे वाचला जीव )
पैसे उधार मागणे
बऱ्यादा खोटं बालून, गोड गोड बोलून किंवा तुमचा विश्वास जिंकून एखादी व्यक्ती पैसे मागू शकते. ही सरळ सरळ फसवणुकीची लक्षण आहेत. त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ऑनलाईन विश्वात वावरताना यापेक्षा देखील अधिक धोके असू शकतात. त्याची खबदारी स्वत:च्या जबाबदारीवर घ्यावी. NDTV कोणत्याही परिणामाला जबाबदार नाही.