जाहिरात
This Article is From Nov 07, 2024

किस-किसको प्यार करूं ... बायको आणि 4 गर्लफ्रेंडसह एकाच सोसायटीत राहत होता तो, आणि एका दिवशी...

नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हिंदी चित्रपटातील कथेसारखी ही घटना भारतामध्ये घडली आहे. ज्याचा कित्येकवर्ष कुणालाच थांगपत्ताही लागला नाही.

किस-किसको प्यार करूं ... बायको आणि 4 गर्लफ्रेंडसह एकाच सोसायटीत राहत होता तो, आणि एका दिवशी...

'किस-किसको प्यार करूं' या हिंदी चित्रपटात,अभिनेता कपिल शर्मा त्याच्या तीन पत्नींसह वेगवेगळ्या मजल्यावर राहत असतो. ज्याचा कुणालाही थांगपत्ता नसतो. चित्रपटामध्येच हे प्रकार घडतात, असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. कपिल शर्माच्या चित्रपटातील ही स्टोरी प्रत्यक्षातही घडलीय. या रिअल लाईफमधील हिरोला एक बायको आणि चार गर्लफ्रेंड आहेत. तो या सर्वांसह एकाच इमारतीमध्ये राहत होता. हिंदी चित्रपटाप्रमाणेच त्याचं हे रहस्य जवळपास 4 वर्ष कुणालाही माहिती नव्हतं. पण, अखेर त्याचं सत्य बाहेर आलं. तो व्यक्ती कोण आहे? त्याच्या आयुष्यातील 5 बायका कोण आहेत? त्याचं बिंग कसं फुटलं? हे सर्व आम्हा तुम्हाला सांगणार आहोत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


हिंदी चित्रपटातील कथेसारखी ही घटना भारतामध्ये नाही तर शेजारच्या चीनमध्ये घडलीय. छद्म ज़ियाओजुन असं या व्यक्तीचं नावं आहे. त्याची स्टोरी सध्या चीनच्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय. ज़ियाओजुन ईशान्य चीनमधील जिलिन प्रांतामध्ये राहतो. 'साऊथ चायना पोस्ट' नं याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, ज़ियाओजुनची आई बाथ हाऊस अटेंडट आहे. तर वडील कामगार होते. पण, त्याला छानछोकीत आयुष्य जगायचं होतं. त्यानुसार त्यानं एका श्रीमंत घराण्याचा वारसदार असल्याची बतावणी केली. आपला स्वत:चा व्यवसाय असल्याचं त्यानं त्याच्या पत्नीला भासवलं. त्याच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून जियोओजिया या तरुणीनं त्याच्याशी लग्न केलं.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर चीनची झोप का उडाली आहे?

(नक्की वाचा: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर चीनची झोप का उडाली आहे?)

    जियोओजीनला लग्नानंतर नवऱ्याचं सत्य समजलं. त्यानंतर तीनं मुलाला एकट्यानं सांभाळण्याचं ठरवलं. पत्नीनं घराबाहेर काढल्यानंतर ज़ियाओजुननं  ज़ियाओहोंग या प्रेयसीचा आधार घेतला. या दोघांची ऑनलाईन मैत्री झाली होती. त्यानं तिला तिच्याकडून 1 लाख 40 हजार युआन रक्कम उधार घेतली. तो तिच्यासोबत जवळच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्या फसवणुकीचे उद्योग एवढ्यावरच थांबली नाही. जियोओजीननं इतर तीन महिलांशी आपले संबंध प्रस्थापित केले. विद्यापीठातील विद्यार्थीनी शाओमिन, झियाओक्सिन आणि परिचारिका झियाओलन. या महिलांकडून त्याने पैसे उकळले.

    भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

    (नक्की वाचा: भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!)

      जियोओजीन श्रीमंत जीवनशैली जगत असल्याचं दाखवत होता. पण, एकेदिवशी  झियाओक्सिनला त्याच्याजवळ बनावट रोख रकमेची बॅग सापडली आणि त्याचं सारं बिंग उघडकीस आलं.  या सर्व प्रकरणानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीनंतर हे सर्व सत्य बाहेर आलंय.

      Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

      Follow us:
      Cheating Girlfriend, विवाहित पुरुषाची 4 मुलींसोबत फसवणूक, Scaminchina, Biggest Fraud, Cheater Husband
      Listen to the latest songs, only on JioSaavn.com