WCL 2025 मध्ये शाहिद आफ्रिदी आणि अजय देवगन यांची भेट झाली? समजून घ्या Viral फोटो मागील सत्य

Viral photo of Ajay Devgan meet Shahid Afridi: सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला भेटताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajay Devgan meet Shahid Afridi : अजय देवगन शाहीद आफ्रिदी यांच्या भेटीचं सत्य समजून घ्या
मुंबई:

Viral photo of Ajay Devgan meet Shahid Afridi: सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला भेटताना दिसत आहेत. हा फोटो पाहून फॅन्स खूप नाराज झाले. खरे तर, भारतीय खेळाडूंनी बहिष्कार टाकल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील लीजेंड्स मॅच रद्द करण्यात आली होती, त्यानंतर हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. यामुळे विशेषतः भारतीय क्रिकेट फॅन्सना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सोशल मीडियावर अजय देवगणबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी शेअर केल्या जाऊ लागल्या. पण या फोटोमागील सत्य आता समोर आले आहे.

फोटोमागील सत्य

जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि वाद निर्माण करत आहे, तो खरं तर WCL च्या 2024 च्या आवृत्तीचा आहे. अजय देवगण बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील WCL 2024 ची फायनल मॅच पाहण्यासाठी गेला होता, जो भारताने जिंकला होता. हा फोटो त्यावेळी काढलेला आहे.

Advertisement

भारतीय खेळाडूंचा सामना खेळण्यास नकार 

शिखर धवनसह अनेक भारतीय खेळाडूंनी खेळण्यास नकार दिल्यानंतर 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स'मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. भारतीय खेळाडूंनी एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ या सामन्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.

Advertisement

(नक्की वाचा : VIDEO: शुभमन गिल मुलीशी बोलत असताना सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया Viral )

या स्पर्धेची दुसरी आवृत्ती 18 जून रोजी एजबेस्टनमध्ये सुरू झाली आहे. स्पर्धेची फायनल 2 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. 'इंडिया लीजेंड्स'चे कर्णधारपद युवराज सिंह भूषवत आहेत आणि संघात हरभजन सिंह, इरफान पठाण, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि वरुण एरॉन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement
Topics mentioned in this article