जाहिरात

VIDEO: शुभमन गिल मुलीशी बोलत असताना सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया Viral

Shubman Gill Talking With Other Girl: शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका मुलीशी बोलताना दिसत आहे.

VIDEO: शुभमन गिल मुलीशी बोलत असताना सारा तेंडुलकरची प्रतिक्रिया Viral
Shubman Gil, Sara Tendulkar : शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर लंडनमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते.
मुंबई:

Shubman Gill Talking With Other Girl: टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही टीममध्ये पाच टेस्टची सीरिज सुरु आहे. या सीरिजसाठी शुबमन गिलची (Shubman Gill) पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून निवड झाली आहे. गिल कॅप्टन झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे. त्यानं पहिल्या दोन टेस्टमध्ये एक डबल सेंच्युरी आणि दोन सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड केले आहेत. मैदानातील कामगिरीमुळे तो चांगलाच चर्चेत आहे. त्याचबरोबर मैदानाबाहेरच्या त्याच्या कृतीचीही चर्चा होत आहे.

शुबमन गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका मुलीशी बोलताना दिसत आहे. त्यांचं हे संभाषण सुरु होतं त्यावेळी गिलच्या मागे सारा तेंडुलकर बसलेली या व्हिडिओत दिसली. सारा यावेळी गिलकडं तिरक्या नजरेनं पाहात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. 

गिल आणि साराबाबत काय आहे चर्चा?

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यात काहीतरी सुरू आहे, अशी अफवा सोशल मीडियावर अनेकदा असते. या दोघांपैकी कुणीही या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. त्यांनी ही सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. पण, तरीही एखाद्या प्रसंगामुळे लोकांना त्यांचे नाव एकत्र जोडण्याची संधी मिळते. या व्हिडिओनंतरही गिल आणि साराबाबतची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 

( नक्की वाचा : Shubman Gill : 'मी गेली 3 वर्ष..'. शुबमन गिलंनं सारा तेंडुलकरसह ब्रेकअपवर रहस्य उलगडलं, Video )
 

हा व्हायरल व्हिडिओ भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्टनंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व भारतीय खेळाडूंनी युवराज सिंहच्या फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. तिथे सचिन तेंडुलकरही संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होता. मात्र, एकाच कार्यक्रमात उपस्थित असूनही गिल आणि सारा यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही. पण काही व्हिडिओमध्ये ते मागे-पुढे दिसले, ते आता वेगानं व्हायरल होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com