The Internet's New Crush: रेल्वेच्या प्रवासात एखादी अनोळखी व्यक्ती भेटली आणि प्रवासाच्या दरम्यान त्या व्यक्तीची मैत्री झाल्याचा प्रकार तुमच्याबाबतीत घडला असेल. पण, एक इन्स्टाग्राम युझर त्याहूनही पुढे गेली. तिला रेल्वेचे तिकीट तपासण्यासाठी आलेला टीसी भलताच आवडला. आजकालच्या भाषेत तो टीसी तिचा क्रश झाला. तिने स्वतः व्हिडिओ शेअर करून मनातली गोष्ट जगासमोर मांडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकं आता या देखण्या तिकीट कलेक्टरचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकार?
तिकीट तपासण्याच्या एका साध्या कृतीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ 'शताब्दी एक्स्प्रेस' च्या डब्यातील आहे, असं सांगितलं जातंय. एका दाढीवाल्या तिकीट कलेक्टर (टीसी) ची ही छोटी इन्स्टाग्राम रील आहे.
या क्लिपमध्ये टीसी तिकीट तपासत कॉरिडॉरमधून जाताना दिसत आहे, तर एक महिला त्याच्या समोर बसलेली आहे. भक्कम देहयष्टी असलेला हा टीसी त्याच्या कामात मग्न आहे. पण त्याला पाहून डब्यात बसलेल्या अनेक महिलांच्या हृदयाची धडधड वाढली असावी. व्हिडिओ शेअर करताना युजरने लिहिले, "हाय, असा टीसी असेल तर मी रोज ट्रेनने प्रवास करेन." व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये कमांडो 3 मधील अरिजित सिंगचे "अखियां मिलावांगा" हे गाणे वाजत आहे.
या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या आहेत. काही जणांनी टीसीच्या रुपाची प्रशंसा केलीय. तर एकानं गंमतीनं लिहलं की, "तिकीट खिडकीतून फेकून द्या, मग तो तुम्हाला पकडून घेऊन जाईल." दुसऱ्या एकाने लिहिले, "तो सरकारी नोकर आहे, त्याला खूप सुंदर बायको मिळेल, तुम्ही स्वप्न पाहू नका."
( नक्की वाचा : पुन्हा एकदा ‘चांद नवाब'! पाकिस्तानी रिपोर्टरचा ‘माझं हृदय धडधडतंय' Video Viral )
काही युजर्सना खऱ्या आयुष्यात या परिस्थितीची कल्पना करण्यापासून स्वतःला थांबवता आले नाही. एकाने लिहिले, "तुम्ही दुसऱ्याच्या भावावर, मुलावर, बॉयफ्रेंडवर नजर टाकता, लाज वाटत नाही का? तसे, ही ट्रेन कोणत्या मार्गावरची आहे?" दुसऱ्या एका युजरने लिहिले, "माझ्याकडे तिकीट नाही, कृपया मला पकडा." तर एकाने लिहिले, "मी त्याला ओळखतो, तो विवाहित आहे." व्हिडिओ व्हायरल होताच हा टीसी प्रसिद्ध झाला आहे आणि लोक त्याचा सोशल मीडियावर शोध घेत आहेत.