Swiggy Order Viral News: सध्य ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. सध्याच्या काळात ऑनलाइन (Online) सुविधा इतकी सुलभ झाली आहे की, ग्राहक एका क्लिकवर किराणा सामान, कपड्यांपासून ते सोनं-चांदीपर्यंतच्या वस्तू मागवतात. पण अनेकदा ही ऑनलाईन शॉपिंग मोठी डोकेदुखी ठरते. असाच काहीसा अनुभव एका व्यक्तीला आला, जेव्हा त्याने Swiggy Instamart वरून चांदीची नाणी (Silver Coins) ऑर्डर केली, पण पॅकेट उघडल्यावर त्यात मॅगी (Maggi) आणि हल्दीरामचे स्नॅक्स (Haldiram's Snacks) निघाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विनित नावाच्या एका ग्राहकाने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर आपला हा अनुभव शेअर केला असून, याला त्याने "Swiggy horror story" असे म्हटले आहे. विनित यांनी ९९९ प्युरिटीची (999 Purity) चांदीची नाणी (Silver Coins) ऑर्डर केली होती. मात्र, त्यांना ९२५ प्युरिटीची नाणी मिळाली, आणि त्यासोबतच मॅगी आणि हल्दीराम स्नॅक्सचे पॅकेटही मिळाले.
कसलं ते डेरिंग! महिलेने बिबट्याला दोरीने बांधलं, चादर टाकून घराबाहेर... खतरनाक VIDEO व्हायरल
डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) विनित यांना स्पष्टपणे सांगितले की, पॅकेट उघडायचे नाही. एकतर संपूर्ण ऑर्डर स्वीकारा किंवा रद्द (Cancel) करा. विनित यांनी या प्रकारानंतर सुमारे ४० मिनिटे ग्राहक सेवा केंद्राच्या (Customer Care) प्रतिनिधींशी चर्चा केली. शेवटी, त्यांनी फक्त चांदीच्या नाण्यांची पिशवी (Pouch) ठेवली आणि मॅगी तसेच इतर वस्तू डिलिव्हरी बॉयला परत (Returned) दिल्या.
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, विनीथने अपडेट केले की स्विगीने योग्य ऑर्डर दिली. यावेळी, बहुतेक नाणी 999 शुद्धतेची होती, परंतु दोन नाणी अजूनही कमी शुद्धतेची होती. स्विगीने सार्वजनिकपणे उत्तर दिले, "विनीथ, आम्हाला तुम्हाला असा अनुभव येऊ नये असे वाटते. कृपया ऑर्डर आयडी शेअर करा जेणेकरून आम्ही ते दुरुस्त करू शकू. आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद."
दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी सोने किंवा चांदी ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर रडू नका. तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की कोणीही इन्स्टंट डिलिव्हरी अॅपवरून उच्च-मूल्याच्या वस्तू का ऑर्डर करेल. विनीथच्या कथेने हे स्पष्ट केले की इन्स्टंट डिलिव्हरी नेहमीच योग्य ऑर्डरची हमी देत नाही.