
Women tied A leopard dangerous Viral Video: बिबट्या.. म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो. भितीने प्रत्येकाचीच गाळण उडते. बिबट्याच्या नुसत्या बातम्यांनी आपण घराबाहेर पडायचे बंद पडतो. अशावेळी जर खरंच तुमच्या घरात बिबट्या आला तर? राजस्थानच्या उदयपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला. उदयपूरमधील एका घरात बिबट्या शिरला, सर्वांची बोबडी वळली, धावपळ उडाली. पण या घरातील एका महिलेने धाडस दाखवत या बिबट्याला चक्क दोरीने बांधून ठेवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या महिलेचे धाडस पाहून नेटकऱ्यांनीही तिचे कौतुक केले आहे. (Rajasthan Dering Women Viral Video)
नेमकं काय घडलं?
राजस्थानातील उदयपूरमधून (Udaypur Leopard Viral Video) एक धक्कादायक आणि मनोरंजक घटना समोर आली आहे. एका घरात अचानक बिबट्या घुसला. सर्वजण घाबरून पळून गेले, पण त्याच घरातील एका महिलेने इतके धाडस दाखवले की त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. घाबरण्याऐवजी, महिलेने धैर्याने आणि शहाणपणाने परिस्थितीचा सामना केला. बिबट्या अचानक परिसरात घुसला आणि एका घरात शिरला. लोक ओरडू लागले, ज्यामुळे घबराट पसरली.
Trending News: नवरा कामासाठी दुबईत, बायकोची सासऱ्यासोबत मजा; VIDEO झाला तुफान व्हायरल!
महिलेने बिबट्याला बांधलं!
पण ती महिला डगमगली नाही. तिने ताबडतोब दोरी पकडली आणि संधी साधून बिबट्याला बांधण्यात यश मिळवले. सहसा अशा परिस्थितीत लोक घाबरून पळून जातात, परंतु या महिलेने तिचे धाडस आणि बुद्धिमत्ता दाखवत या बिबट्यालाच जेरबंद केले. त्यानंतर तिने वन विभागाला फोन करून माहिती दिली. काही वेळातच, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्याला सुरक्षितपणे पकडले आणि जंगलात सोडले.
उदयपुर में तेंदुआ घर में घुसा,
— Mr.B.M.YADAV (@BMYADAV7062) September 26, 2025
लेकिन महिला ने आद्मम साहस दिखाया!
रस्सी से बांधकर वन विभाग को बुलाया,
शेरनी सोची होगी कि ये दूसरी शेरनी मुझे कहां से बांध पाएगी।
सोशल मीडिया अब कह रहा है,
महिला असली शेरनी, पति बेचारा कहीं दुबक कर बैठ गया! pic.twitter.com/nCESOzAXbP
या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्याला घराबाहेर दोरीने बांधले आहे तो त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे मात्र महिला त्याला दोरीने ओढत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून महिलेच्या शौर्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिला हीच खरी वाघीण म्हटलं आहे तर काहीजणांनी बिबट्याचे हे हाल आहेत तर नवऱ्याचे काय होत असेल? असा मजेशीर सवालही केला आहे. तर आणखी एकाने "बिबट्याला प्रश्न पडला असेल की ही दुसरी सिंहीण कुठून आली? अशीही भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world