जाहिरात

Strange Wedding: घोडीवर चढण्याआधी आई नवरदेवाला स्तनपान का देते? कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Strange Wedding Ritual: काही परंपरा अशा असतात ज्या पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करतात, पण ज्या समुदायात त्या पाळल्या जातात, त्यांच्यासाठी त्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या असतात.

Strange Wedding: घोडीवर चढण्याआधी आई नवरदेवाला स्तनपान का देते? कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Strange Wedding Ritual: ग्नाच्या दिवशी आई आपल्या मुलाला 'स्तनपान' (breastfeeding) करण्याची प्रथा पूर्ण करते.
मुंबई:

Strange Wedding Ritual: आपल्या देशातील लग्नं  म्हणजे केवळ विधी किंवा परंपरा नसतात; ते कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचा एक मोठा उत्सव असतो. काही परंपरा अशा असतात ज्या पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करतात, पण ज्या समुदायात त्या पाळल्या जातात, त्यांच्यासाठी त्या अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या असतात. अशीच एक प्रथा आहे, जिथे लग्नाच्या दिवशी आई आपल्या मुलाला 'स्तनपान' (breastfeeding) करण्याची प्रथा पूर्ण करते.

हे ऐकायला विचित्र वाटू शकते, पण या परंपरेमागे खूप जुन्या समजुती आणि मातृत्वभावना जोडलेल्या आहेत.

ही परंपरा कुठे पाळली जाते?

ही प्रथा मुख्यतः राजस्थानमधील काही विशिष्ट समुदायांमध्ये, हरियाणाच्या काही गावांमध्ये आणि पश्चिम नेपाळच्या काही भागांत पाळली जाते. प्रत्येक ठिकाणी ही रीत पूर्ण करण्याची पद्धत वेगळी आहे. अनेक ठिकाणी ही रस्म प्रत्यक्ष न करता केवळ प्रतिकात्मक स्वरूपात पूर्ण केली जाते.

( नक्की वाचा : Strange Wedding: दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीशी लग्न, कारण वाचून डोक्याला माराल हात! )
 


काय आहे खरा अर्थ?

प्राचीन काळी आईला मुलाची पहिली गुरू आणि त्याला जीवन देणारी मानले जात असे. लग्नाच्या दिवशी पार पाडल्या जाणाऱ्या या प्रथेमधून दोन महत्त्वाचे संकेत दिले जातात:

आईकडून दिलेलं 'अखेरचं पोषण': विवाहाच्या माध्यमातून मुलगा नवीन जीवनात पदार्पण करत असतो, त्यामुळे आईने दिलेले हे 'अखेरचे पोषण' मानले जाते. ही प्रथा एका अर्थाने मुलाला नवीन आयुष्यासाठी निरोप देण्याचा भाव व्यक्त करते.

नातेसंबंधाची दृढता: पत्नी आयुष्यात आल्यानंतरही आई-मुलाचे नाते आणि आईचे प्रेम विसरू नये, हा संदेश समाजाने दिला होता. ही रस्म लग्न झाल्यावरही आई-मुलाचे नाते मजबूत राहील याचे प्रतीक मानली जाते.

( नक्की वाचा : Trending News : लग्नानंतर 72 तासांत नववधूची घटस्फोटाची मागणी,वाचा पहिल्या रात्री नेमकं काय घडलं? )
 

ही प्रथा इतकी महत्त्वाची का होती?

पूर्वीच्या काळात कुटुंबं मोठी होती आणि नात्यांची भूमिका निश्चित केलेली होती. या कारणामुळे ही प्रथा खालील 3 गोष्टींसाठी आवश्यक मानली जात होती:

1. मातृभावनांचा सन्मान: लग्नाच्या दिवशी आई आपल्या मुलाशी खूप भावनिकदृष्ट्या जोडलेली असते. ही प्रथा त्या भावनिक जोडणीला आणि आईच्या भावनांना सन्मान देण्यासाठी पाळली जात असे.
2. मुळांची आठवण : लग्नानंतरही मुलाने आपले संस्कार आणि कुटुंब विसरू नये, याची आठवण त्याला या प्रथेतून करून दिली जाई.
3. आईच्या योगदानाचे स्मरण: आईचे कुटुंबातील योगदान किती महत्त्वाचे आहे, हे संपूर्ण समाजाला दाखवण्यासाठी ही रस्म सार्वजनिक आशीर्वादासारखी मानली जात होती.

आई हयात नसेल तर काय?

काही ठिकाणी, आई हयात नसेल, तर मोठ्या भावाची पत्नी म्हणजेच जाऊबाई ही घराची 'दुसरी आई' मानली जाते. म्हणून, ती प्रतिकात्मक रूपात ही रस्म पूर्ण करते. इथे स्तनपान करणे हा कोणताही जैविक भाग नसून, मुलावरील प्रेम आणि जबाबदारीचे ते फक्त एक संकेत असते.

आज ही प्रथा खरंच पाळली जाते का?

आजच्या काळात, बहुतेक ठिकाणी ही रस्म केवळ प्रतीकात्मक स्वरूपात पाळली जाते. उदाहरणार्थ आई नवरदेवाचे डोके आपल्या छातीशी लावते, त्याला आशीर्वाद देते, किंवा केवळ प्रथेचं नाव घेऊन ती पूर्ण केली जाते. प्रत्यक्ष स्तनपान करण्याची पद्धत आता बहुतांश ठिकाणांवर पाळली जात नाही.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com