Video: मोठं झाल्यावर रणवीर सिंग बनणार! शाळेच्या असाइनमेंटमध्ये मुलानं लिहिली मनातली गोष्ट, मॅडमही झाल्या थक्क

का शाळेत मुलांना त्यांची पसंत आणि भविष्यातील धेय्याबाबत लिहिण्यासाठी सांगितलं. तेव्हा एका मुलाचं उत्तर पाहून शिक्षिकाही थक्क झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
School Assignment Viral Post

School Assignment Viral: एका शाळेत मुलांना त्यांची पसंत आणि भविष्यातील धेय्याबाबत लिहिण्यासाठी सांगितलं. तेव्हा एका मुलाचं उत्तर पाहून शिक्षिकाही थक्क झाली.या मुलाने लिहिलं की, बॉलिवू़डचा एनर्जी किंग रणवीर सिंगसारखं कलाकार बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. मुलाने फक्त कोरा पानच भरला नाही, तर त्याने भन्नाट टॅलेंटही दाखवला. मुलाने रणवीर सिंगचा धुरंधरमधील हमजाचं पात्र एका स्केचद्वारे तयार केलं. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोक त्याला 'प्युअर गोल्ड' म्हणत आहेत.

डान्स, सिंगिंग आणि रणवीरसारखी स्टाईल

असाइनमेंटमध्ये मुलाने असंही म्हटलं की, त्याला फक्त एक्टिंगच नाही, तर डान्सिंग आणि सिंगिंगचीही खूप आवड आहे. त्याला रणवीर सिंग यासाठी पसंत आहे, कारण तो अष्टपैलू अभिनय करतो. एवढ्या कमी वयात कठोर मेहनत करणं कौतुकास्पद आहे. सध्याच्या घडीला बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगचा दबदबा आहे. त्याचा चित्रपट धुरंधर आणि धुरंधर 2 ने मिळून एकूण 3000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.हा भारतीय सिनेमातील अशी फ्रंचायजी आहे,ज्याने हा जादुई आकडा गाठला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: प्रवाशाच्या कडेवर लहान मुल..100 रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न, एकही थांबली नाही, डोंबिवलीत संताप

ही पोस्ट व्हायरल होताच लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला. कोणी याला फ्यूचर सुपरस्टार म्हणत आहे. तर कोणी म्हणत आहे की,स्वत: रणवीर सिंगला या मुलाला भेटलं पाहिजे.ज्या पद्धतीने मुलाने त्याच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.