Dombivli Video Viral : डोंबिवलीतील एका प्रवाशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दर्शन परब नावाचे प्रवासी लहान मुलाला कडेवर घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.त्यांनी तब्बल 100 हून अधिक रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला.पण एकही रिक्षा थांबली नाही, असा दावा या प्रवाशाने व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
मनसे नेते राजू पाटील यांचं ट्वीट होतंय व्हायरल
या घटनेमुळे रिक्षाचालकांच्या वाढत्या मनमानीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू पाटील यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना टॅग केलं आहे. पाटील यांनी ट्वीटरवर म्हटलंय की,"दादा,तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री पण झालात याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे".
नक्की वाचा >> Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 'त्या' पदांवरील भरतीचा निर्णय रद्द; पुण्यातील उमेदवारांमध्ये संताप
मा. @PratapSarnaik दादा,
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 19, 2026
तुम्ही तसे पुर्वाश्रमीचे डोंबिवलीकर ! आज तुम्ही ठाणेकर झाला असलात तरी मला खात्री आहे की आपल्या डोंबिवलीकरांप्रती तुमचे जुने प्रेम आजही तसेच आहे. कधी काळी डोंबिवलीत रिक्षा चालवून व हलाकीचे दिवस सोसून आज आपण स्वकतृत्वाने कष्ट करून मोठे झालात,परिवहन मंत्री… pic.twitter.com/9FJnsv81lI
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात मृत व्यक्तीच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता हडपली, मास्टरमाईंडसह अख्खी टोळी खाणार जेलची हवा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा
"आपल्या डोंबिवली व कल्याणचे परिवहन व्यवस्थापन व नियोजन अत्यंत ‘थर्ड क्लास' आहे.इथल्या राजकीय ‘भाई-दादा' यांच्या रिक्षा युनियनचे सदस्य असल्याने रिक्षाचालकांची मुजोरी तर एवढी वाढली आहे की विचारून सोय नाही.तरी कृपया तुम्ही एकदा कल्याण-डोंबिवलीत येऊन इथल्या वाहतूक व परिवहन व्यवस्थेची तुमच्या पद्धतीने झाडाझडती घ्यावी ही विनंती". या घटनेनंतर कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता परिवहन विभाग या प्रकरणावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world