- डोंगराळ भागात ट्रेकिंगनंतर गरमागरम मॅगी विक्रीचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो
- बादल ठाकूर यांनी डोंगरावर तात्पुरता मॅगी स्टॉल लावून एका दिवसात हजारो रुपयांची कमाई केली
- एक दिवसात सुमारे 350 प्लेट्स मॅगी विकून जवळपास एकूण २१ हजार रुपयांची उलाढाल केली
Maggi In Mountains: व्यवसाय आणि पर्यटनाची चांगली सांगड एका तरुणाने घातली आहे. डोंगराळ भागांत ट्रेकिंग किंवा लांबच्या प्रवासानंतर मिळणारी गरमागरम मॅगी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मात्र, हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे, याचे विश्लेषण सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर बादल ठाकूर याने एका प्रयोगाद्वारे केले आहे. घरापेक्षा डोंबरावर मॅगीची चव का वाढते, यामागे प्रवासाचा थकवा आणि तेथील वातावरण कारणीभूत असल्याचे मत त्याने व्यक्त केले. शिवाया व्यवसायातून कमाईचे थक्क करणारे आकडे ही त्याने सर्वां समोर ठेवले आहेत. ते पाहून तर नोकरी सोडा मॅगी विका असचं नेटीझन म्हणत आहेत.
बादलने डोंगराळ भागात एक तात्पुरता स्टॉल लावला होता. त्या स्टॉवर तो मॅगी विकू लागला. हे त्याने प्रायोगित तत्वावर सुरू केले होते. 70 ते 100 रुपयांना एक प्लेट या दराने त्याने मॅगीची विक्री सुरू केली. त्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या 4 ते 5 तासांत त्याने मॅगीच्या 200 प्लेट्सची विक्री केली. तर दिवसाअखेर हा आकडा 350 पर्यंत पोहोचला. कच्च्या मालाचा खर्च वजा करता, एका दिवसाची उलाढाल 21,000 रुपयांच्या घरात गेल्याचे त्याने दाखवून दिले. मॅगी विकून दिवसाला 21 हजार कमावता येतात हे त्याने दाखवून दिले.
जरी ही आकडेवारी आकर्षक वाटत असली, तरी यात गॅस सिलिंडर, वाहतूक आणि मजुरी यांसारख्या खर्चांचा समावेश करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला 3.5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तरुणांमध्ये या 'बिझनेस मॉडेल'बद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. बादलने शेअर केलेल्या हिशोबावरून युजर्सनी गणित मांडलं की, जर दिवसाची कमाई 21,000 रुपये असेल, तर महिन्याला 6 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे हा व्यवसाय फायद्याचा ठरत आहे.
व्हिडिओमध्ये लोक अक्षरशः रांगा लावून मॅगी घेताना दिसत आहेत. यावर एका युजरने गमतीत विचारलं, "मग मी आता नोकरी सोडू का?" जवळपास 15 रुपयांना मिळणारे मॅगीचे पाकीट डोंगराच्या थंड हवेत 70 ते 100 रुपयांना विकले जाते. यात एलपीजी आणि इतर खर्च वजा जाताही मोठा नफा उरतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र या तरूणाने हे दाखवून दिले आहे की कोणते ही काम कमी नाही. थोडी हिंमत आणि विचारपूर्वक पाऊल उचलले तर हा व्यवसाय किती मोठा ठरू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल.