एका सुपरमार्केटचा मालक असलेल्या रोहीत सिंह राजपूत नावाच्या तरुणाने एका व्हिडिओद्वारे मोठ्या कंपन्या ग्राहकांना 'व्हॅल्यू पॅक' च्या नावाखाली गंडवत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केलाय. रोहितने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला 6 लाख 97 हजार व्ह्यूज मिळाले असून 16 हजार लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडिओमध्ये त्याने सर्फ एक्सेल आणि विम जेल या लोकप्रिय उत्पादनांचे उदाहरण देत दरातील मोठी तफावत उघड केली आहे.
नक्की वाचा: हिवाळ्यात तुळशीचे रोप कसे राहील हिरवेगार? फॉलो करा या 3 टिप्स
80 रुपयांऐवजी द्यावे लागतायत 128 रुपये
रोहितने सर्फ एक्सेल साबणाचे उदाहरण देताना सांगितले की, 100 ग्रॅमची वडी 10 रुपयांना मिळते आणि 150 ग्रॅमची वडी 20 रुपयांना मिळते. दुसरीकडे, सर्फ एक्सेलचा 'सुपर व्हॅल्यू पॅक' 128 रुपयांना मिळतो. या व्हॅल्यू पॅकमध्ये 4 साबणाच्या वड्या असतात, ज्यांचे एकूण वजन 800 ग्रॅम असते.रोहितच्या मते, ग्राहकांनी साधा हिशोब केल्यास त्यांचे मोठे नुकसान टळू शकते. जर तुम्ही 10 रुपयांच्या 100 ग्रॅम वजनाच्या 8 वड्या घेतल्या, तर त्यांचे एकूण वजन 800 ग्रॅम होते आणि त्यांची किंमत केवळ 80 रुपये होते. याचा अर्थ, 128 रुपयांचा व्हॅल्यू पॅक घेण्याऐवजी, 10 रुपयांच्या 8 वड्या घेतल्यास ग्राहकांचे तब्बल 48 रुपये वाचू शकतात. यावरून 'व्हॅल्यू पॅक' हा ग्राहकांसाठी नसून, केवळ कंपन्यांना मोठा फायदा मिळवून देण्यासाठी असतो, हे सिद्ध होते असं रोहितचं म्हणणं आहे.
नक्की वाचा: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे
भांडी धुण्याच्या साबणातही होतेय लुबाडणूक?
विम जेलची किंमतही अधिक रोहितने भांडी धुण्याच्या विम जेल या लिक्विड साबणाचेही उदाहरण दिले. बाजारात 130 एमएलचे पॅकेट 20 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, 150 एमएलचे पॅकेट 58 रुपयांना मिळते, प्लॅस्टीकच्या बॉटलचाही दर धरला तरी या बॉटलची किंमत 43 रुपये असायला हवी होती. त्याचप्रमाणे, 500 एमएलची बॉटल 130 रुपयांना मिळते, प्लॅस्टीकच्या बॉटलचाही दर धरला तरी या बॉटलची योग्य किंमत 87 रुपये असायला हवी. 750 एमएल बॉटलसाठी 205 रुपये लागतात, प्लॅस्टीकच्या बॉटलचाही दर धरला तरी या बॉटलची किंमत या बॉटलची किंमत 130 रुपये असायला हवी असं रोहितचं म्हणणं आहे. 'श्री बालाजी सुपर मार्केट' चा मालक असलेल्या रोहितने ग्राहकांना कंपन्यांच्या या 'मूर्ख बनविण्याच्या जाळ्यात' अडकू नका, असे आवाहन केले आहे.