जाहिरात

Loaded Water Social Media Trend: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे

Loaded Water Health Benefits: लोडेड वॉटर घरी कसे तयार करायचे? आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील?

Loaded Water Social Media Trend: लोडेड वॉटर म्हणजे काय? फिटनेसप्रेमींमधील नव्या ट्रेंडचा धुमाकूळ, वाचा फायदे
"What Is Loaded Water : लोडेड वॉटर म्हणजे काय?"
Canva

Loaded Water Health Benefits: 'लोडेट वॉटर' आणि 'अ‍ॅनहँस्ड वॉटर' या दोन गोष्टी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं पाण्यासारखं पाणीच आहे ना? तर मंडळींनो हे साधेसुधे पाणी नाहीय. हे पेय व्हिटॅमिन्स, खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स किंवा वनस्पतींचा अर्क यासारख्या गोष्टींच्या मदतीने तयार केले जाते. तहान भागवण्याव्यतिरिक्त या पाण्यामुळे शरीराला ऊर्जा आणि पोषणतत्त्वांचाही पुरवठा होतो. 

लोडेट वॉटरद्वारे शरीराला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा होतो?

बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत लोडेड वॉटर आरोग्यासाठी खास मानले जातंय, कारण यामध्ये आरोग्यास आवश्यक असणाऱ्या पोषणतत्त्वांचा समावेश असतो. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शिअम, झिंक, इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा होतो. काही ब्रँड्स लोडेड वॉटरमध्ये फळांचा अर्क, ग्रीन टी अर्क किंवा अँटी-ऑक्सिडंट्सचाही समावेश करतात, जेणेकरून उत्तम चवीसह आरोग्यदायी फायदेही मिळतील. 

Coriander Water Benefits: सलग 15 दिवस धण्याचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये होईल मोठा बदल

(नक्की वाचा: Coriander Water Benefits: सलग 15 दिवस धण्याचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरामध्ये होईल मोठा बदल)

फिटनेसप्रेमींमधील नवा ट्रेंड | Loaded Water Social Media New Trend

आता लोक केवळ शरीर हायड्रेट ठेवण्यावर नव्हे तर निरोगी राहण्यावरही भर देत आहेत. वर्कआऊट करणारी मंडळी, फिटनेस फ्रिक आणि डाएटिंग करणाऱ्या लोकांमध्ये हे पेय लोकप्रिय झालंय. स्पोर्ट्स ड्रिंकला पौष्टिक पर्याय म्हणून लोक लोडेड वॉटरचा डाएटमध्ये समावेश करत आहेत. आपल्या देशातील कित्येक सेलिब्रिटी मंडळी देखील लोडेड वॉटरचा वापर करतात. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे डिटॉक्स वॉटर देखील याच श्रेणीमध्ये मोडते. खिलाडी कुमारच्या पाण्यामध्ये लिंबू, काकडी आणि पुदिना यासारख्या तत्त्वांचा समावेश आहे. 

Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा

(नक्की वाचा: Lemon Benefits: रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे का, दिवसभरात किती लिंबांचं सेवन करावे, फायद्या-तोट्यांसह 18 प्रश्नांची उत्तर वाचा)

लोडेड वॉटर का आवश्यक आहे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुमच्या शरीराला आहाराच्या माध्यमातून दिवसभरात पुरेशा प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होणार असेल तर लोडेड वॉटरची आवश्यकता नाही. पण तुम्ही प्रवास करत असाल किंवा कामामध्ये व्यस्त असाल, खाण्यापिण्यासाठी वेळ नसेल आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित ठेवायचे असेल तर लोडेड वॉटर पौष्टिक पर्याय ठरू शकतो. पण काही ब्रँड्समध्ये साखरेचा किंवा कृत्रिम फ्लेव्हरचा वापर केला जातो, त्या गोष्टी टाळाव्या.  

Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल)

घराच्या घरी कसे तयार करावे लोडेड वॉटर?

  • तज्ज्ञांच्या मते, घरच्या घरी देखील तुम्ही लोडेड वॉटर तयार करू शकता. 
  • तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि ते गरम करा.
  • काकडी, आंबट फळं लिंबू किंवा संत्रे यासारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे जास्त प्रमाण असणाऱ्या फळांचा वापर करावा. 
  • सर्व सामग्री पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवू नका. कारण आंबट फळांमुळे पाण्याची चव कडू होईल. 
  • इन्फ्यूज्ड वॉटर फ्रीजमध्ये एका सीलबंद भांड्यामध्ये ठेवावे. शक्यतो काचेची बाटली वापरल्यास उत्तम.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com