Swiftlet Saliva Nest: सोन्याहून महाग 'या' चिमणीची लाळ! पांढऱ्या सोन्याचा बाजारात धुमाकूळ,कारण जाणून व्हाल थक्क

Swiftlet Saliva Nest: स्विफ्टलेट पक्षी सुक्या काड्यांऐवजी स्वतःच्या घट्ट लाळेपासून घरटे बनवतो, ज्याला 'पांढरे सोने' म्हटले जाते. सोन्यापेक्षाही महाग असलेल्या या घरट्याचे रहस्य आणि त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Swiftlet Saliva Nest: लाखो रुपयांच्या किंमतीत विकली जाते या पक्षाची लाळ"
jungliudaan09

Birds Expensive Nest: सोनं आणि सोन्याची चमक कोणाला आवडत नाही? लोक दागिने खरेदी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात, पण निसर्गातील 'स्विफ्टलेट' (Swiftlet) नावाच्या एका छोट्याशा पक्ष्याने अशी बाजारपेठ उभी केली आहे, ज्याच्यापुढे सोनेही फिके पडेल. हा पक्षी गवत किंवा काड्यांपासून नव्हे तर स्वतःच्या घट्ट लाळेपासून घरटे तयार करतो, ज्याला लोक 'पांढरे सोने' (White Gold) म्हणतात.

Photo Credit: jungliudaan09

सोन्यापेक्षा महागडी पक्ष्याची लाळ (Saliva based nest and its skyrocketing price)

आशियाई बाजारपेठेत या घरट्यांची मागणी कोणत्याही हिऱ्या-दागिन्यांपेक्षा कमी नाही. चीन आणि हाँगकाँग यासारख्या देशांमध्ये जेव्हा या घरट्यांचे सूप तयार केले जाते, तेव्हा त्याची किंमत हजारो-लाखो रुपयांमध्ये मोजली जाते. स्विफ्टलेटचे एक किलो शुद्ध घरटे खरेदी करणे म्हणजे एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या वर्षभराच्या बजेटसारखे असू शकते. श्रीमंत लोक या सूपला आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारकशक्तीचे (Immunity) आणि चमकदार त्वचेचे सीक्रेट मानतात.

Advertisement

अंधाऱ्या गुहेतून डायनिंग टेबलपर्यंतचा प्रवास (nest expensive than gold)

हा पक्षी आपली घरटी अतिशय उंच, अंधाऱ्या आणि धोकादायक गुहांमध्ये बांधतो. आपली लाळ खडकांवर चिकटवून हा पक्षी तास-न्-तास मेहनत करतो, लाळ वाळल्यानंतर दगडासारखी कडक होते. या घरट्यांच्या वाढत्या मागणीमुळे आज बेकायदेशीर तस्करी आणि घरटी तोडण्याचा धंदाही वेगाने वाढत आहे. या वाढत्या मागणीने आता या पक्ष्यांच्या अस्तित्वावरही धोका निर्माण केला आहे.

(नक्की वाचा: Viral Video: ताडोबाचे जंगल, ते तिघे अन् नैसर्गिक स्विमिंग पूल! 'या' Video तून निसर्गाच्या रुपाची अनुभूती)

Photo Credit: pexels

स्विफ्टलेट पक्षाची लाळ खरोखरच आरोग्याचा खजिना आहे का? (health benefits of bird nest)

पारंपरिक चिनी औषधांमध्ये या घरट्याला प्रोटीन आणि अमिनो ॲसिडचे पावरहाऊस मानले जाते. वृद्ध आणि आजारी लोकांसाठी स्विफ्टलेटच्या लाळेपासून तयार केलेले घरटं एखाद्या अमृतापेक्षा कमी नाही. पण बाजारपेठेत अस्सल घरट्यांच्या नावाखाली अनेक बनावट प्रोडक्ट्स देखील विकले जात आहेत, ज्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. 
 
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article