Famous Singer And Dancer Video Viral : स्टेज परफॉर्म करताना अनोख्या अंदाजात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणं हे काही नवीन नाही. अनेक सेलिब्रिटी स्टेजवर जाऊन असा काही धमाका करतात, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन होतं. पण तैवानची स्टार जोलिन त्साईने तब्बल 30 मीटर लांब सापावर उभे राहून भन्नाट परफॉर्मन्स दिलं. या गायिकेचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
गायिकेचं नृत्य पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
स्टेज परफॉर्मन्स परफेक्ट करण्यासाठी कलाकार नेहमी त्यांचं नृत्य आणि गाण्यांमध्ये वैविध्यता आणतात. ही कला एका वेगळ्या पातळीवर नेण्यासाठी तैवानच्या या प्रसिद्ध सुपरस्टारने अनोखा प्रयत्न केला.तिने एका प्रचंड मोठ्या सापावर नृत्य सादर केले. हे नृत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जोलिन ज्या महाकाय सापावर नृत्य करते, त्या सापाला पहिल्यांदा पाहिल्यावर तो खरा आहे असं वाटतं. पण व्हिडीओत दिसणारा साप हा खरा नाहीय. तो एक स्ट्रक्चर आहे. या 30 मीटर सापाला क्रू मेंबर्सनी लाईव्ह ऑपरेट केले होते.सोशल मीडियावर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये जोलिन या सापाच्या डोक्यावर नृत्य करताना दिसते.
नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल
या इव्हेंटला 40 हजार प्रेक्षकांची उपस्थिती
हा परफॉर्मन्स जोलिनच्या वर्ल्ड टूरचा एक भाग आहे.30 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत चाललेला हा कार्यक्रम तायपेई येथे पार पडला होता. या इव्हेंटला जवळपास 40000 प्रेक्षक उपस्तिथ होते. तैवानचं मिडिया आऊटलेट KBIZoom ने दिलेल्या माहितीनुसार, त्साईने अंदाजे NT$900 मिलियन म्हणजेच 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
नक्की वाचा >> GK News: महाराष्ट्राच्या जवळच आहे भारतातील 9 राज्यांपेक्षाही मोठा जिल्हा, इथेच वसलंय जगातील सर्वात श्रीमंत गाव
हा आतापर्यंतचा सर्वात महागडा आशियाई पॉप टूर ठरला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हा साप खरा असल्यासारखंच वाटलं. पण व्हिडीओत दिसणारा साप नकली आहे. तो स्टेजवरचा एक सेटअप आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तसच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.