Biggest District In India : भारतात एक असाही जिल्हा आहे,जो तब्बल 9 राज्यांपेक्षा मोठा आहे. एक जिल्हा 9 राज्यांपेक्षा मोठा कसा असू शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. याच्या तुलनेत 9 राज्येही लहान वाटतात. तसच हा जिल्हा जगातील सर्वात मोठा मिठाचा वाळवंट आणि अनोख्या संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणत्या राज्यात आहे आणि त्याची खासियत काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारताचा सर्वात मोठा जिल्हा
गुजरात राज्यातील कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. तो देशातील तब्बल 9 राज्यांपेक्षा मोठा आहे.कच्छचे क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर इतके आहे. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रण उत्सव आणि पांढऱ्या चादरीसारख्या दिसणाऱ्या मिठाच्या वाळवंटाचे सौंदर्य,जे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू मानले जाते.
1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे भाषेच्या आधारावर गुजरात आणि महाराष्ट्र असे विभाजन करण्यात आले. त्यानंतर कच्छ गुजरातमध्ये आलं. कच्छ गुजरातच्या एकूण क्षेत्रफळाच्या 23.27% भाग व्यापतो. तसच समुद्रकिनारा जवळपास 406 किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.भूज हे या जिल्ह्याचेमुख्यालय आहे. या जिल्ह्याचा निम्म्याहून अधिक भाग वाळवंटाने व्यापलेला आहे. दरम्यान, कच्छ जिल्ह्यात 939 गावे,6 नगरपालिका आणि 10 तालुक्यांचा समावेश आहे.या जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 2092371 एवढी
आहे.
नक्की वाचा >> GK: नववर्षात सर्वात पहिलं सूर्योदय कुठे झालं? जगातील एकमेव ठिकाण, जिथे सर्वात आधी होते 1 जानेवारीची मध्यरात्र
नगरपालिकांची नावे
1.भूज (Bhuj)
2. मांडवी (Mandvi)
3.मुंद्रा (Mundra)
4.रापर (Rapar)
5.भाचाऊ (Bhachau)
6. अंजार (Anjar)
तालुक्यांची नावे
अबदासा (Abdasa),अंजार (Anjar),भचाऊ (Bhachau),भूज (Bhuj), गांधीधाम (Gandhidham,) लखपत
(Lakhpat),मांडवी (Mandvi),नखत्राणा (Nakhatrana),रापर (Rapar),मुंद्रा (Mundra)
कच्छ जिल्हा भारतातील 9 राज्यांपेक्षा मोठा आहे. यामध्ये 3 प्रदेश आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.
नक्की वाचा >> OTT Web Series 2026 : 'पंचायत 5', 'हीरामंडी 2' ते 'मटका किंग', 2026 मध्ये येतायत झोप उडवणाऱ्या 'या' 8 वेबसीरिज
राज्य
हरियाणा
केरल
गोवा
केंद्र शासित राज्य
दिल्ली
पद्दुचेरी
चंदीगढ
लक्षदीप
अंदमान निकोबार
कच्छ जिल्ह्याची खासियत
या जिल्ह्याची खास गोष्ट म्हणजे येथे जगातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट आहे. येथे दरवर्षी रण उत्सव आयोजित केला जातो, जो येथील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. येथील मुख्य खाद्यपदार्थ म्हणजे बाजरीपासून बनवलेला रटोला, जो येथील स्थानिक लोक ताक आणि लोणीसोबत खातात. या भागात बाजरीची सुरुवात राजा लाखो फुलाणी यांनी केली होती.
या जिल्ह्यात आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव
गुजरातच्या कच्छमध्ये जगातील सर्वात श्रीमंत गाव आहे, ज्याचे नाव आहे माधापार. या गावात तब्बल १७ बँक शाखा आहेत, ज्यातून या गावाची आर्थिक ताकद दिसून येते. या गावातील बहुतांश लोक NRI (Non-Resident Indian) आहेत, जे व्यवसाय किंवा रोजगारासाठी भारताबाहेर इतर देशांमध्ये राहतात आणि तिथून पैसे पाठवतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world