शाळेत शिक्षक विद्यार्थ्याना ओरडतात, वेळ पडली तर मारतात देखील. विद्यार्थ्याचं भविष्य चांगलं व्हावं हा या मागचा उद्देश असतो. मात्र विद्यार्थ्यांना याबाबत मनात राग ठेवला तर परिणाम भयंकर होतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. सध्या आजकाल अमेरिकेतील अनेक शिक्षक ऑनलाइन छळाचे बळी ठरत आहेत. TikTok बाबत शिक्षकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
शिक्षकांवर नाराज असलेले अनेक विद्यार्थी बदला घेण्यासाठी TikTok ची मदत घेत आहेत. शिक्षकांना बनावट अकाऊंट तयार करुन त्रास देत आहेत. फेब्रुवारीमध्ये, पेनसिल्व्हेनियामधील मॅल्व्हर्न येथील ग्रेट व्हॅली मिडल स्कूलमध्ये स्पॅनिश शिक्षिका पॅट्रिस मोट्झ, टिकटॉक हल्ल्याच्या बळी ठरल्या होत्या. पॅट्रिस मोट्झला यांना कल्पना नव्हती की काही मुलांनी सूड उगवण्यासाठी त्यांचे बनावट TikTok अकाऊंट तयार केले आणि त्यांचे फोटो अपलोड केले आहेत.
काही विद्यार्थ्यांनी मोट्झ यांच्या नावाने बनावट टिकटॉक अकाउंट बनवले होते. मोट्झ यांनी याआधी कधीही TikTok वापरले नव्हते. या बनावट अकाऊंटवर त्यांचे पती आणि त्यांच्या लहान मुलांसोबत बीचवरचा तिचा खरा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.
काही दिवसांनंतर शाळेतील अनेक शिक्षकांना आढळले की ते बनावट टिकटॉक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यांच्या अकाऊंटवर वर्णद्वेषी मीम्स, लैंगिक संबंध अशा अनेक आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या. शेकडो विद्यार्थीही या बनावट अकाऊंट्सना फॉलो करत होते.
या घटनांनंतर सखोल तपासात काही विद्यार्थ्यांची नावे समोर आली. ज्यांना मुख्याध्यापकांनी निलंबित केले होते. ऑनलाइन छळाचा बळी ठरलेल्या मोट्झ यांनी सांगितले की, हे खुप वाईट आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या कुटुंबावर इतके वैयक्तित हल्ले करतील असं वाटलं नव्हतं. ऑनलाइन छळाचे बळी ठरलेले काही शिक्षक आता वर्गात त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीही बोलायला घाबरत आहेत.