Viral Video: रिलसाठी हद्द केली! तरुणीने रेल्वे रुळावर सुसाट कार पळवली, पाहा VIDEO

Women Driving Car On Railway Track Viral Video: या घटनेमुळे बेंगळुरू आणि हैदराबाद दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. या इंस्टाग्राम रीलला काही तासांतच 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Car On Railway Track: रील काढण्यासाठी, सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल ह्याचा काही नेम नाही. रीलच्या हटके कंटेटसाठी तरुण-तरुणी नको ते प्रताप करत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने रीलसाठी रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवल्याचं समोर आले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

रील बनवण्याच्या नादात आपण कोणत्या थराला जाऊ याचे सुद्धा भान नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करत आहे  हैदराबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारी लखनऊची रहिवासी रविका सोनीने इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर कार चालवली. ही घटना नागुलापल्ली आणि शंकरपल्ली दरम्यान घडली, जिथे रविकाच्या कृत्याने शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घातले.

Viral Video : दोन दगड वाजवण्याचा ट्रेंडचा इंटनेटवर धुमाकूळ 'दिल पे चलाई छुरियां' गाणारा राजू कलाकार कोण आहे?

रविकाने तिची कार थेट रेल्वे ट्रॅकवर चालवली आणि ती वेगाने चालवली. "धाडसी रील" सोशल मीडियावर पोस्ट करता यावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. यादरम्यान, रेल्वे सेवा तात्काळ बंद करण्यात आल्या, ज्यामुळे अनेक मार्गांवर तासनतास गाड्या अडकून पडल्या. रेल्वे वाहतूक ठप्प झाली, सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही, अधिकाऱ्यांच्या मते, जर ट्रेन काही मिनिटे आधी तिथे पोहोचली असती तर एक भयानक अपघात घडू शकला असता. रेल्वे नियंत्रण कक्षातून ट्रॅकचे निरीक्षण करताना हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले.

Jaipur Hotel Video: खिडकीत जोडपे बेभान, पाहण्यासाठी पुलावर वाहतुकीचे तुफान

दरम्यान, या घटनेमुळे बेंगळुरू आणि हैदराबाद दरम्यानची रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. या इंस्टाग्राम रीलला काही तासांतच 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, अनेक वापरकर्त्यांनी ही घटना वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ज्यावर लोक तीव्र प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Advertisement