जाहिरात

Viral Video : दोन दगड वाजवण्याचा ट्रेंडचा इंटनेटवर धुमाकूळ 'दिल पे चलाई छुरियां' गाणारा राजू कलाकार कोण आहे?

Viral Trend : सध्या इंस्टाग्राम उघडताच प्रत्येक दुसरी रील 'दिल पे चलाईं छुरियां' या गाण्याची पाहायला मिळतेय.

Viral Video : दोन दगड वाजवण्याचा ट्रेंडचा इंटनेटवर धुमाकूळ 'दिल पे चलाई छुरियां' गाणारा राजू कलाकार कोण आहे?
दिल पे चलाईं छुरियां' या रिलला 16 कोटींपेक्षा जास्त Views मिळाले आहेत.
मुंबई:

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध होण्यासाठी लोकं रिॲलिटी शोमध्ये त्यांचं टॅलेंट दाखवत असतं. पण रिॲलिटी शोमध्ये जाणंही सोपं नव्हतं. त्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. मोठ्या संघर्षानंतर रिॲलिटी शोमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळायची. पण आज तसं नाहीये. आज लोकांना प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही रिॲलिटी शोमध्ये जाण्याची तितकी गरज राहिलेली नाही. आता तर फक्त इंस्टाग्रामवर एखादी हटके रिल बनवली तरी ते सोशल मीडियावर आधी व्हायरल आणि नंतर प्रसिद्ध होऊ शकतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इन्स्टाग्रामच्या रिलच्या माध्यमातून स्टार झालेली अनेक उदाहरण सध्या पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे.  सध्या इंस्टाग्राम उघडताच प्रत्येक दुसरी रील 'दिल पे चलाईं छुरियां' या गाण्याची पाहायला मिळतेय. या गाण्याच्या क्रेझने सोशल मीडिया युझर्सना वेड लावलं आहे. अनेक जण या  ट्रेंडवर मजेदार रील्स बनवत आहे. या ट्रेंडमागे असलेला खरा कलाकार म्हणजेच हा ट्रेंड सुरू करणारा व्यक्ती आहे 'राजू कलाकार' .राजूनं काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की त्याने प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती काही लोकांमध्ये उभा राहून दोन दगड वाजवत 'बेवफा सनम' चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'दिल पे चलाईं छुरियां' गाताना दिसतो. त्याच्या परफॉर्मन्ससमोर खुर्च्यांवर बसलेले लोकं आनंद घेताना दिसत आहेत. त्याच्या आवाजाची आणि स्वरांची जादू सोशल मीडिया युझर्सना चांगलीच भावली आहे.  आतापर्यंत या व्हिडिओला 16 कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या ट्रेंडला फॉलो करताना दिसत आहेत.

कोण आहे राजू कलाकार?

या व्यक्तीचं खरं नाव राजू भट्ट आहे, जो राजस्थानचा रहिवासी असून सध्या गुजरातच्या सुरत शहरात राहतोय. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तो 'राजू कलाकार' या नावाने देशभरात प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की सोशल मीडिया युझर्स या गाण्यावर राजूची ॲक्टिंग करत वेगवेगळे आणि मजेदार रील्स बनवत आहेत. इतकंच नाही तर, या ट्रेंडचं वेड सेलिब्रिटींच्या डोक्यातही चढलं आहे. कोरिओग्राफर रेमो डिसूझा (@remodsouza) नेही आपल्या पत्नीसोबत या ट्रेंडवर रील बनवली आहे.

राजूने सांगितलं की, त्याने एकदा ट्रेनमध्ये एका मुलाकडून दगड वाजवून संगीत कसं तयार करायचं हे शिकून घेतलं होतं. त्याला कधीही वाटलं नव्हतं की त्यामुळे तो इतका प्रसिद्ध होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com