Doomsday Fish : 12 फूट लांब, वजन 200 किलो! प्रलयाचा मासा...; हा मासा वाढवतोय जगाचं टेन्शन, भयंकर असा इतिहास

एकीकडे इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाने जगाचं टेन्शन आधीच वाढलंय. आणि यात एका माशामुळे जगात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते असं म्हटलं जातंय.

जाहिरात
Read Time: 2 mins

Oarfish or Doomsday Fish : एकीकडे इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाने जगाचं टेन्शन आधीच वाढलंय. आणि यात एका माशामुळे जगात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते असं म्हटलं जातंय. मेक्सिकोत दिसलेला हा मासा नव्या संकटाची चाहूल आहे का असं म्हटलं जातंय. कोणता आहे हा मासा? 

युद्धाची धग अजूनही शांत व्हायचं नाव घेईना. इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर बॉम्बचा वर्षाव सुरूच आहे. तीन देशांमधील वादाची झळ अख्ख्या जगाला बसतेय. अशातच एक नवं टेन्शन जगासमोर उभं राहिलं आहे. समुद्र किनाऱ्यावर दिसणारा हा मासा नीट बघा. साधारण 7 ते 12 फूट लांब. 50 ते 200 किलो वजन. हा मासा अवघ्या जगाचं टेन्शन वाढवतोय. पिराना माशाप्रमाणे हा जीवघेणा देखील नाही. पण तरीही या माशाने जगाचं इतकं टेन्शन का वाढवलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर इतिहासात आहे. 

जगातील सर्वात लांब हाडांचा मासा

या माशाला ओरफिश किंवा डूम्सडे फिश असं म्हणतात. याची ओळख ही प्रलयाचा मासा अशी आहे. हे नाव जपानी लोककथांमधून आलंय. जपानमध्ये याला रुगू नो सुकाई असं म्हणतात. ओरफिश हा जगातील सर्वात लांब हाडांचा मासा आहे. याची लांबी 30 फुटांपेक्षाही जास्त असू शकते. याचा रंग चांदीसारखा चमकणारा असतो. शरीराचा आकार रिबीनसारखा चपटा असतो. डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो. हा ओरफिश समुद्राच्या तळाशी 3 हजार फूट खोलवर राहतो. 

Advertisement

डूम्सडे फिश कुठेही दिसला की भूकंप किंवा त्सुनामीची भीती

डूम्सडे फिश कुठेही दिसला की भूकंप किंवा त्सुनामी येते असं म्हटलं जातं. नुकताच हा डुम्सडे मासा मेक्सिकोच्या काबो सैन लुकास समुद्र किनाऱ्यावर दिसला. या माशाचा भूकंपाशी कोणताही थेट संबंध नाही असं शास्त्रज्ञांचं मत आहे. 2025 च्या सुरूवातीला भारतात तामिळनाडू किनाऱ्यावर हा मासा दिसला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये देखील केवळ 20 दिवसांचा अंतरात हे मासे चार वेळा दिसले होते. आता मेक्सिकोत हा ओरफिश दिसलाय.

Topics mentioned in this article