165 मुलांचा बाप आहे 'हा' गणिताचा शिक्षक, सध्या 10 महिला आहेत गर्भवती, तरीही....

अमेरिकेतील 48 वर्षांचा गणिताच्या शिक्षक तब्बल 165 मुलांचा बाप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अमेरिकेतील 48 वर्षांच्या गणिताच्या शिक्षकाची मुलं जगभरात आहेत. त्यांनी गेल्या बुधवारीच आणखी एका मुलाच्या जन्माचा आनंद साजरा केला. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार एरी नेगल (Ari Nagel) असं या व्यक्तीचं नाव आहे. तो स्पर्म डोनर असून त्याला 'द स्पर्मिनेटर' (The Sperminator)  या नावानं देखील ओळखलं जातं. ब्रुकलिन (Brooklyn) मध्ये राहणाऱ्या ऐरी यांचे मुलं जगभरातील बहुतेक खंडांमध्ये आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कधी होणार निवृत्त?

'मी 50 वर्षांचा होईल त्यावेळी स्पर्म डोनर म्हणून अधिकृतपणे निवृत्ती घेणार आहे,' अशी घोषणा एरी यांनी केलीय.  ते या ऑगस्टमध्ये 49 वर्षांचे होत आहेत. मी 50 व्या वर्षी स्पर्म डोनेट करणे बंद करेन. शारीरिक दृष्टीनं मी सुरु ठेवू शकतो. पण, वृद्ध पुरुषांमध्ये ऑटिझमसारख्या गोष्टींचा धोका वाढू शकतो, असं त्यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलं. 

मुलांना कसं लक्षात ठेवतात?

नेगल यांच्यापासून सध्या अमेरिका, कॅनडा या देशांसह आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये 10 महिला गर्भवती आहेत. एक महिला कोणत्याही क्षणी मुलाला जन्म देऊ शकते. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दोन मुलांचं आगमन अपेक्षित आहे. नेगल त्यांच्या प्रत्येक मुलाचं नाव, वाढदिवस, पत्ता आणि फोन नंबर याचा रेकॉर्ड एका सविस्तर स्प्रेडशीटमध्ये लिहून ठेवतात. त्याचबरोबर ऑफिसच्या भिंतीवरही ते मुलांची फोटो लावतात. न्यूयॉर्क, न्यू जर्सी भागातील मुलांना ते अनेकदा भेटतात. तसंच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांचे फोटो शेअर करतात. 

नेगेल यांनी आपल्या मुलांशी यापुढे संपर्कात राहू असं सांगितलंय. पण, ते अद्याप त्यांच्या 34 मुलांना कधीही भेटलेले नाहीत. दरवर्षी 'फादर्स डे' च्या दिवशी मला मुलांपासून कार्ड आणि गिफ्ट्स मिळतात, असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडींग बातमी - 'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का
 

काय आहे शल्य?

नेगेल यांनी 8 वर्षांपूर्वी स्पर्म डोनर म्हणून काम करण्यास सुरुवात केलीय. तेंव्हापासून त्यांनी दर आठवड्यात एक - दोन महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्म सँपल पाठवले आहेत. पण, प्रेमाच्या बाबतीत ते लकी नाहीत. 'माझ्याकडं डेटिंग अ‍ॅप आहे, पण अद्याप 165 मुलांच्या वडिलांशी डेट करेल अशी एक एकही महिला मला मिळालेली नाही,' असं शल्य त्यांनी बोलून दाखवलं.