जाहिरात
Story ProgressBack

'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का

Mysterious Woman : ही महिला रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडून लोकांच्या घराची बेल वाजवते. दार उघडलं नाही तर रडू लागते.

Read Time: 2 mins
'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का
ग्वाहलेर:

मध्य प्रदेशातील ग्वाहलेरमधील चंदन नगर भागात सध्या भीतीचं वातावरण आहे. एका महिलेची या भागात दहशत पसरलीय. ही महिला रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडून लोकांच्या घराची बेल वाजवते. दार उघडलं नाही तर रडू लागते. त्यानंतर वेगवेगळे आवाज काढते आणि नंतर गायब होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. पोलिसांच्या तपासात या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे सत्य?

ही महिला रात्री लोकांचा दार ठोठावते तसंच बेल वाजवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शहरात दहशत पसरली. अनेक चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी याचं सत्य शोधलं त्यानंतर याचा खुलासा झाला. ही महिला कोणतीही प्रेतात्मा नाही. तसंच तिचा गुन्हेगारी टोळीशी देखील संबंध नाही.  

या महिलेनं 8 जून 2024 रोजी रात्री दोन तीन घरांचे दरवाजे ठोठावले, अशी माहिती आहे. त्यानंतर परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. कुणी तिला प्रेतात्मा म्हणत होतं तर कुणी ती चोर असल्याचा संशय व्यक्त करत होतं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हे सत्य शोधण्यासाठी एक खास टीम तयार केली. या टीमनं सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दहशतीचं कारण बनलेल्या या महिलेला शोधून काढलं. 

( नक्की वाचा : सुपरस्टारची गर्लफ्रेंड Pavithra Gowda कोण आहे? मर्डर मिस्ट्रीशी तिचा संबंध काय? )
 

ही रहस्यमय महिला ग्वाहलेरमधील आपगंज पोलीस स्टेशनच्या जवळ तिचा मित्री विकीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. या महिलेचा यापूर्वीच घटस्फोट झालाय. तसंच तिला सहा वर्षांची मुलगी आहे. या महिलेचं विकीसोबत 8 जून रोजी भांडण झालं. त्यानंतर तो घर सोडून दुसरीकडं निघून गेला. त्यानंतर ती विकीच्या शोधात चंदन नगरमध्ये फिरु लागली. तिनं काही घरांची बेल वाजवली. 

डीसीपी हेडक्वार्टर अशोक जादौन यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मित्र विकी शाक्यचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'विकी आणि त्या महिलेची सुमारे सहा वर्षांपूर्वी भेट झाली होती. तेंव्हापासून ते दोघं एकत्र राहात होते आणि एकमेकांशी लग्न करणार होते. या महिलेनं माझा शोध घेण्यासाठीच दाराची बेल वाजवली. त्यानंतर ती माझ्या घरी आली. तिचा कोणताही वाईट हेतू नव्हता.' विकी आणि या महिलेची आणखी चौकशी करण्यात येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
उद्धव ठाकरे पुन्हा CM होईपर्यंत मन:शांती मिळणार नाही, शंकराचार्यांचं मोठं वक्तव्य
'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का
Kuwait fire incident Over 40 indians died fire department lieutenant colonel ali shared details
Next Article
माणसांनी खचाखच भरलेली इमारत, बाहेर पडण्याची संधीच नव्हती; कुवेत अग्निशमन दलाने सांगितले-कसे जिवंत जळाले 49 लोक?
;