Emotional Video: "आज माझा शेवटचा दिवस..", शाळेतील वर्गात शिक्षिकेचे शब्द ऐकताच मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला

एका शिक्षिकेनं शाळेत आज शेवटचा दिवस असल्याचं मुलांना जसं सांगितलं..त्यानंतर संपूर्ण वर्गातील चित्र बदललं. व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
Teacher And Student Viral Video

Students And Teacher Emotional Video :  रोजच्या प्रमाणे शाळेत एक दिवस अगदी सामान्य पद्धतीने सुरु झाला. पण काही वेळातच तो क्षण खूप भावुक झाला. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे की, एका शिक्षिकेनं शाळेत आज शेवटचा दिवस असल्याचं मुलांना जसं सांगितलं..त्यानंतर संपूर्ण वर्गातील चित्र बदललं. हा व्हिडीओ @ebuu_dd नावाच्या यूजरने शेअर केला आहे.आता हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

शिक्षिकेचे शब्द ऐकताच मुलांना रडू कोसळलं

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की, शिक्षिका मुलांसोबत हसत असते. पण त्या शाळा सोडून जाणार आहेत,असं जेव्हा मुलांना सांगतात. त्यावेळी मुलं पुरते भावुक होतात. काही मुलं रडतात. काही मुलं शिक्षिकेला गळाभेट देऊन खूप रडतात. त्यावेळी शिक्षिका सुद्धा मुलांना सांभाळताना आणि दिलासा देत असल्याचं व्हिडीओत पाहू शकता. हे दृष्य इतकं भावुक होतं की, पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावतात.

Advertisement

नक्की वाचा >> महिलेनं तब्बल 27 किलो वजन घटवलं, कोणत्या वेळी काय करावं? ट्रेनरने सांगितला Fat Loss चा नंबर 1 प्लॅन

टीचर फक्त शिकवतच नाही..आईसारख्या असतात..

Ebita Rai ने व्हिडीओ शेअर करत जबरदस्त कॅप्शनही लिहिलं आहे. एक टीचर फक्त शिकवतच नाही, तर ती दुसऱ्या आईसारखी असते. जी मुलांना सांभाळते, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करते.

लोकांनी शेअर केल्या त्यांच्या आठवणी

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. एका यूजरने म्हटलंय की, फेव्हरेट टीचरला निरोप देणं म्हणजे हृदय तुटण्यासारखं आहे.दुसऱ्याने म्हटलं की, एका चांगल्या शिक्षिकेची हीच खरी पोचपावती आहे.अनेक लोकांनी त्यांच्या जुन्या शिक्षिकेच्या आठवणी ताज्या करत भावुक कमेंट्स केल्या आहेत.