Fat Loss Diet: जिममध्ये तासंतास व्यायाम करून घाम गाळणे म्हणजेच वजन कमी करणं नव्हे. त्याचसोबत शरीराला लागणाऱ्या सकस आहाराचीही खूप गरज असते. आजच्या जमन्यात खूप लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये कंबर कसतात, पण त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. कारण ते त्यांचं प्री-वर्कआऊट आणि पोस्ट वर्कआऊट खाण्यावर लक्ष देत नाहीत. एका वेट लॉस ट्रेनरने 27 किलो वजन कमी करून हे सिद्ध केलं की, तुम्ही जर सकस आहार योग्य वेळी फॉलो केला, तर फॅट लॉस करणं सोपं होतं.त्यांचं म्हणणं आहे की, वर्कआऊटच्या आधी शरीराला योग्य एनर्जी देणं आणि नंतर रिकव्हरीसाठी योग्य आहार फॉलो करणच खरं गेम चेंजर आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये ब्रिटनी मॅकक्रिस्टलने म्हटलंय की, तुमच्या वर्कआऊटच्या आधी आणि नंतर शरीराला योग्य आहार द्या. एनर्जीसाठी थोडे कार्ब्स, मसल्स मजबूत करण्यासाठी प्रोटिन आणि योग्य वेळ देणे, या सर्व गोष्टींचा फायदा रिकव्हरी करण्यासाठीही होतो. याचा थेट परिणाम फॅट लॉस वर होतो आणि तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो.
प्री-वर्कआऊट मील एनर्जीचं योग्य सोर्स
वर्कआऊट सुरु करण्याआधी शरीराला एनर्जी देणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही रिकाम्या पोटी चुकीचे पदार्थ खात असाल किंवा व्यायाम कराल, तर लवकर थकवा येईल. तसच तुमची एनर्जीही कमी होईल. कोचच्या माहितीनुसार,प्री वर्कआऊट मीलमध्ये थोडे कार्ब्स आणि थोडं प्रोटिन असलं पाहिजे. यामुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि मसल्स मजबूत होतात.
काही सोपे ऑप्शन्स
केळी आणि बदाम
राईस केके आणि शेंगदाणे
ओट्स,दालचिनी आणि ब्लू बेरी
ग्रीक योगर्ट आणि बेरी
खूप जास्त प्रोटिन घेऊ नका, कारण यामुळे कॅलरी काऊंट वाढेल आणि वजन वाढेल
वर्कआऊटनंतरचं मील, रिकव्हरी आणि फॅट लॉसचा फॉर्म्युला
वर्कआऊटनंतर शरीराची रिकव्हरी होणं महत्त्वाचं असतं. हीच ते वेळ असते, जेव्हा शरीरात फॅट लॉस वेगाने होते.30-60 मिनिटांमध्ये योग्य आहार घेणं गरजेचं असतं, यामुळे मसल्स रिपेअर होतात आणि एनर्जी लेव्हल मिळते, असं ट्रेनरचं म्हणणं आहे.
योग्य पोस्ट वर्कआऊट मील
ग्रिल्ड चिकन,सफरचंद आणि ब्रोकली
व्हेजी ऑमलेट आणि एव्हाकोडो
प्रोटिन शेक, ओट्स आणि बदामाचं दूध
सॅल्मन, क्विनोआ आणि हिरव्या भाज्या
या वेळेत 15-25 ग्रॅम प्रोटिन इनटेक करणं गरजेचं आहे. यामुळे मसल्स रिकव्हरी वेगाने होते आणि शरीर जास्त कॅलरी बर्न करतं.
हायड्रेशन खूप गरजेचं
पाण्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं.पण हे वेट लॉसचा महत्त्वाचा भाग आहे. वर्कआऊट आधी, वर्कआऊट करताना आणि त्यानंतरही हायड्रेशन खूप महत्त्वाचं असतं. यामुळे मसल्स क्रॅम्पपासून सुटका होते. शरीराचं तापमान संतुलीत राहतं. स्टॅमिना आणि फोकस चांगलं राहतं आणि रिकव्हरीही लवकर होते. जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल,तर फक्त वर्कआऊटवर नाही, तर स्मार्ट इटिंगवरही लक्ष द्या.योग्य वेळी योग्य खाणं तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ शकतं.
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world