"माझा शाप..", चॉकलेट न दिल्याने तृतीयपंथीयाने तरुणीसोबत केला विचित्र प्रकार, मेट्रो स्थानकातील व्हिडीओ व्हायरल

तृतीयपंथीयाने एक तरुणीच्या डोक्यावर गुटखा थुंकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तृतीयपंथीयाचा हा कारनामा या तरुणीनं मोबाईल कॅमेरात कैद केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Transgender Video Viral

Transgender Metro Train Viral Video : तृतीयपंथीयांचे ट्रेनमधील व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. तृतीयपंथीय ट्रेन प्रवासात लोकांकडून पैसै मागतात. पण जर कोणी पैसै दिले नाही, तर ते सहसा त्यांच्या मर्यादा ओलांडत नाहीत.पण काही वेळा तृतीतपंथीय सैरावैरा होतात आणि प्रवाशांसोबत नको ते कृत्य करतात.असाच एक धक्कादायक प्रकार दिल्ली मेट्रो स्थानकावर घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, एका तृतीयपंथीयाने एक तरुणीच्या डोक्यावर गुटखा थुंकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तृतीयपंथीयाचा हा कारनामा या तरुणीनं मोबाईल कॅमेरात कैद केला. तरुणी व्हिडीओ शूट करत असल्याचं तृतीयपंथीयाला लक्षात येताच त्याने व्हिडीओ डिलीट करण्यासाठी दबाव टाकला. 

तृतीयपंथीयाने तरुणीला जबरदस्तीने दिला आशीर्वाद

एखाद्यावर थुंकणे ही अत्यंत घृणास्पद कृती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या कृतीचं समर्थन करता येत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तृतीयपंथीय त्या मुलीला ‘जबरदस्तीचा आशीर्वाद' देत तिच्याकडील चॉकलेट घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण मुलगी ते देण्यास नकार देते आणि स्वतःचा व्हिडिओ शूट करत राहते.याच कारणामुळे त्रस्त होऊन तृतीयपंथी तिच्यासोबत अशी वर्तणूक करतो आणि त्यावेळई तिच्यासोबत आणखी दोन तृतीयपंथी असतात. जेव्हा तृतीयपंथीय तरुणीकडे चॉकलेट मागतो, तेव्हा ती तरुणी विचारते की, हे कोणासाठी घेऊन जाणार आहे? यावर तो तृतीयपंथी उत्तर देतो,"तृतीयपंथीयाचा शाप घेऊ नका..", त्यानंतर संतापलेला तृतीयपंथीय त्या तरुणीच्या तोंडावर थुंकतो. तेव्हा ती तरुणी त्याला म्हणते, हे सर्व रेकॉर्ड झालं आहे. त्यानंतर ती तरुणी तृतीयपंथीयाचा पाठलाग करत व्हिडीओ पुन्हा रेकॉर्ड करते. 

नक्की वाचा >> गिरीश महाजनांनंतर पंकजा मुंडे वादात, बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला नाही, आंबेडकरी जनतेत संताप

इथे पाहा तृतीयपंथी आणि तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

“एका ट्रान्सजेंडर महिलेने मुलीवर गुटखा थुंकला.लग्नसमारंभ,वाढदिवस,ट्रॅफिक सिग्नल्स,अगदी ट्रेनमध्येही ट्रान्सजेंडर्सचे नग्न होणे,हल्ला करणे,ओरडणे आणि आशीर्वादाच्या नावाखाली पैसे हिसकावणे ही सामान्य गोष्ट झाली आहे,जिथे ते निर्दोष नागरिकांना त्रास देतात.हे स्वीकारता येऊ शकत नाही",असं या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये म्हटलं आहे. सूरजने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “आता ट्रान्सजेंडर लोक रागावले आहेत. थुंकतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्या मुलीसोबत सतत वाद घालत राहिले. हे स्पष्ट दिसत आहे की तिथे इतर लोक उपस्थित नसते,तर ते तिला जबरदस्तीने व्हिडिओ डिलीट करायला भाग पाडले असते.हा सरळ-सरळ छळ आहे.”

नक्की वाचा >> घरकाम करणाऱ्या मुलीला बेडमध्ये लपवायचे, नंतर तिच्यासोबत करायचे घाणेरडा प्रकार, Video आला समोर