Viral Video: देखो ना गाइज, देखो ना...Instagramवरील व्हायरल ऑडिओ क्लिपचा खरा क्रीएटर पाहिला? रातोरात झाला स्टार

Dekho Na Guys Original Video: इन्स्टाग्रामवरील कोणत्या-न्-कोणत्या व्हिडीओमध्ये 'देखो ना गाइज, देखो ना...' हे वाक्य नक्कीच ऐकू येते. या आवाजामागील खरा चेहरा आता समोर आलाय. ओरिजिनल व्हिडीओ पाहिला का?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Viral Video: 'देखो ना गाइज, देखो ना' ऑडिओचा खरा चेहरा आला समोर"
Apiso Longling Instagram

Dekho Na Guys Original Video: सोशल मीडियाचं जग खूप चित्रविचित्र आहे, असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इथे कधी कोण 'स्टार' होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावरील बहुतांश रील आणि मीममध्ये एकच आवाज ऐकू येतोय, तो म्हणजे 'देखो ना गाईज, देखो ना, देखो ना...' हे वाक्य इतके गंमतीशीर आहे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यावर थिरकताना किंवा कॉमेडी व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की या आवाजामागील चेहरा नेमका कसा दिसतो?

हा कोणी डबिंग आर्टिस्ट नसून ईशान्य भारतातील (नॉर्थ ईस्ट) एक सामान्य तरुण आहे.  इंस्टाग्राम युजर @apiso_longling हा या आवाजाचा खरा 'जादूगार' आहे. सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा त्याने एक साधा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता, तेव्हा त्यालाही कल्पना नसेल की त्याचा हा साधेपणा संपूर्ण देशाला हसायला भाग पाडेल.

Advertisement

जंगलातून सुरू झालेली 'देखो ना' ची गोष्ट (The Origin Story of Dekho Na Guys Viral Video)

व्हिडीओमध्ये हा तरुण घनदाट जंगल आणि आपल्या शेताच्या मध्यभागी उभा राहून व्लॉगिंग करण्याचा प्रयत्न करत होता. शुटिंग करताना पहिलीच ओळ होती 'देखो ना गाईज, देखो ना, देखो ना... मैं कहां आ गया हूं.' त्याने ज्या पद्धतीने आणि स्टाइलमध्ये त्याने हे वाक्य म्हटलं ते थेट लोकांच्या मनात भिडले. व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत एक महिला देखील दिसतेय.

(नक्की वाचा: Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो, वडिलांची आहे कार्बन कॉपी; या भूमिकेत गाजवणार सिनेसृष्टी?)

अपीसोचा साधेपणा आणि बोलण्यातील देसी अंदाज इतका हिट झाला की मोठमोठे इन्फ्लुएन्सर्सही त्याला कॉपी करू लागले. अपीसोने इन्स्टा बायोमध्येही 'देखो ना गाईज' असे लिहिले आहे.

(नक्की वाचा: Gulab Jamun History: ना गुलाब ना जामुन तरीही गुलाब जामुन नाव का पडलं? 99% लोकांना अर्थच माहिती नाही, वाचा मिठाईचा इतिहास)

Advertisement

वर्षभरानंतरही इंटरनेटवर दबदबा कायम (This Viral Meme Trend)

विशेष म्हणजे मूळ व्हिडीओपेक्षा याची ऑडिओ क्लिप जास्त व्हायरल झाली आहे. या ऑडिओवर लाखो रिल्स तयार झाले आहेत. एक वर्ष उलटून गेल्यानंतरही या वाक्याची क्रेझ कमी झालेली नाही. जेव्हा कधी एखादा नवीन गंमतीशीर व्हिडीओ येतो, तेव्हा बॅकग्राउंडमध्ये 'देखो ना गाईज'ची एण्ट्री वेगळंच वातावरण तयार करते. असं म्हणतात ना की, टॅलेंटपेक्षा कधीकधी साधेपणा लोकांना जास्त भावतो. अपीसोच्या या एका ओळीने त्याला रातोरात सेलिब्रिटी बनवले.  

(Disclaimer: ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओच्या आधारे देण्यात आली आहे. NDTV याची पुष्टी करत नाही.)