Pokemon Tiffin Box Fight: पोकेमॉनचा टिफिन बॉक्स तोडल्याने रडू लागला, जिने तोडला तिच्याशी लग्न करून मोकळा झाला

Viral Post: या महिलेची पोस्ट 18 लाख लोकांपर्यंत पोहोचली असून 26 हजार जणांनी त्याला लाईक केलंय

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Pokemon Tiffin Box Fight: रविवारी फ्रेंडशिप डे (Friendship Day 2025) साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त एका महिलेने X वर केलेल्या पोस्टवर इतका भन्नाट प्रतिसाद मिळालाय की त्याची कल्पनाही करू शकत नाही. आंचल रावतने X वर एक पोस्ट करत दोन फोटो शेअर केले आहेत. तिची ही पोस्ट 18 लाख लोकांपर्यंत पोहोचली असून 26 हजार जणांनी त्याला लाइक केलंय तर दीड हजाराहून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आंचल रावतची पोस्ट काय आहे?

"मी शाळेत असताना मुलांशी फार मैत्री करावी असे मला वाटत नव्हते. एक हुशार, लाजाळू मुलगा आला आणि त्याने त्याचा डबा माझ्यापुढे केला. चुकून मी त्याचा पोकेमॉनचा टिफीन बॉक्स तोडला...यामुळे तो जवळपास रडायला आला होता आणि त्यानंतर तो माझ्याशी कधीही बोलला नाही. 

कट टू 15 वर्षानंतर...मला तोच हुशार मुलगा जीवनसाथीवर दिसला. त्याने मला केलेला पहिलाच मेसेज होता की, तू मला नवीन टिफीन बॉक्स खरेदी करून देशील का ?

आमची शाळेत मैत्री झाली नाही मात्र आमचं लग्न मात्र नक्की झालं. 

हॅप्पी फ्रेंडशिप डे पती देव"

आंचलच्या या पोस्टवर X वर निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. यातल्या काही निवडक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत.