UP News: बाईकवरून जाणाऱ्या समोर पोलिसांनी हात जोडले; बाईकवर एवढेजण पाहून पोलिसाही थबकले

बाईकस्वाराला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 7000 रुपयांचा मोठा दंड ठोठावला. पोलिसांनी तरुणाला वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जाहिरात
Read Time: 1 min
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • हापुड़ जिले में एक मोटरसाइकिल पर सात सवारियां देख पुलिसवाले भी हैरान रह गए और हाथ जोड़कर खड़े हो गए
  • गढ़मुक्तेश्वर के पलवाड़ा चेक पोस्ट पर ट्रैफिक पुलिस ने बाइक सवार को बच्चों सहित सात सवारियों के साथ पकड़ा
  • बाइक पर एक युवक के साथ छह नाबालिग बच्चे सवार थे, जो नियमों का उल्लंघन कर रहे थे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Viral News: मोटारसायकलवर साधारणपणे दोन लोक प्रवास करतात, पण उत्तर प्रदेशातील हापुड येथे एका बाईकवर सात प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा प्रकार पाहून खुद्द पोलीसही आश्चर्यचकित झाले.

नेमके काय घडले?

मंगळवारी सकाळी गडमुक्तेश्वर येथील पलवाडा चेक पोस्टवर वाहतूक पोलीस तपासणी करत होते. यावेळी हायवेच्या दिशेने जात असलेल्या एका मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी थांबवले. बाईकवर बसलेल्या प्रवाशांची संख्या पाहून पोलिसांना धक्का बसला. बाईक चालवणाऱ्या व्यक्तीसह त्यावर एकूण सात जण, ज्यात सहा अल्पवयीन मुले होती.

पोलिसांनी हे दृश्य पाहून बाईकस्वारासमोर हात जोडून उभे राहून, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कारण, एकाच दुचाकीवर एवढी जास्त माणसे, विशेषतः लहान मुलांना घेऊन प्रवास करणे त्यांच्या आणि इतरांच्याही जीविताला धोकादायक होते.

कारवाई आणि दंड

या बेफिकीर कृत्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. बाईकस्वाराला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 7000 रुपयांचा मोठा दंड ठोठावला. पोलिसांनी तरुणाला वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले, तसेच स्वतःसोबतच मुलांच्या जीवाची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले.

Advertisement

Topics mentioned in this article