Trending News : अमेरिका आणि भारत इतके वेगळे!अमेरिकी आईनं जगाला सांगितले दोन देशांमधील 9 फरक, सर्वत्र चर्चा

India vs America differences : अन्ना हाकेनसन या अमेरिकन महिलेनं तिच्या कुटुंबासह सुमारे 2.5 महिने भारतात घालवल्यानंतरचे आपले अनुभव एका व्हायरल इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
India vs America differences : अमेरिकन महिलेची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
मुंबई:

India vs America differences : अन्ना हाकेनसन या अमेरिकन महिलेनं तिच्या कुटुंबासह सुमारे 2.5 महिने भारतात घालवल्यानंतरचे आपले अनुभव एका व्हायरल इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि दैनंदिन जीवनातील फरक तिने अगदी रंजक आणि आपुलकीच्या पद्धतीने मांडले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे आणि लाखो भारतीय तिच्या या निरीक्षणार्थी सहमत होत आहेत.

अन्नाने कबूल केले की, तिला भारत वेगळा असेल हे माहित होते, पण तो किती वेगळा आणि विशेष असेल, याचा तिला अंदाज नव्हता. तिने मांडलेले दोन्ही देशांमधील 9 महत्त्वाचे फरक खालीलप्रमाणे आहेत, जे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवतात.

भारत आणि अमेरिकेतील 9 फरक

1. संवाद आणि लोकांशी कनेक्शन

अमेरिका : अमेरिकेत लोक अनोळखी व्यक्तींशी बोलणे टाळतात आणि एकमेंकांना दुर्लक्ष करण्यात ते निष्णात असतात.
भारत: भारतात लोक मनापासून जोडले जातात आणि अनोळखी व्यक्तींना देखील आपलेसे वाटायला लावतात. लोक तुम्हाला सहज विचारतात, "कुठून आलात, कुठे जात आहात, का?"

2. हॉर्न वाजवणे

अमेरिका: अमेरिकेत हॉर्न वाजवणे म्हणजे 'राग' किंवा 'संताप' व्यक्त करणे असे मानले जाते आणि हॉर्न वाजवणारी व्यक्ती आता चिडणार आहे, असा त्याचा अर्थ असतो.

Advertisement

भारत: भारतात हॉर्नचा अर्थ खूपच वेगळा आहे. इथे हॉर्न म्हणजे फक्त 'मी आलो आहे, जरा पाहून घ्या!' किंवा 'रस्ता द्या' असा साधा संकेत असतो.

( नक्की वाचा : Cab Driver : 'भैय्या' म्हणू नका... ' कॅब ड्रायव्हरने कारमध्ये प्रवाशांसाठी लावले 6 'कडक' नियम, चर्चा तर होणारच )
 

3. मसालेदार खाद्यपदार्थ

अमेरिका: अमेरिकेमध्ये मसालेदार (Spicy) याचा अर्थ 'किंचित झणझणीत' असा असतो.
भारत: भारतात मसाल्यांची चव इतकी तीव्र असते की, विदेशी लोकांना ते पचवणेही कधीकधी कठीण होते.

Advertisement

4. कचरा व्यवस्थापन

अमेरिका: अमेरिकेत कचरा थेट कचरापेटीत (Dustbin) टाकला जातो.
भारत: अन्नाच्या अनुभवानुसार, भारतात अनेक ठिकाणी लोक कचरा 'जिथे आहात तिथेच सोडून देतात' (पण, आता परिस्थिती नक्कीच बदलत आहे आणि स्वच्छता राखली जात आहे).

5. वाहन चालवण्याची पद्धत

अमेरिका: अमेरिकेत लोक नियमांचे पालन करून वाहन चालवतात.
भारत: भारतात वाहन चालवणे हे 'नियंत्रित अराजकता' (Controlled Chaos) असते. ही अशी पद्धत आहे, जी केवळ भारतीयच योग्य प्रकारे समजू शकतात आणि हाताळू शकतात.

Advertisement

( नक्की वाचा : Husband on Rent: 'या' देशात महिलांवर नवरा भाड्यानं घेण्याची वेळ, अगदी एक तासासाठीही मिळतो पुरुष! )

6. हवामानाचा अनुभव

अमेरिका: अमेरिकेत ऋतूंचे चार स्पष्ट टप्पे (Four Seasons) असतात.
भारत: भारतात प्रामुख्याने उन्हाळा, मान्सून आणि त्यासोबतच 'आश्चर्यकारक अतिरिक्त उष्णता' (Surprise Extra Heat) अनुभवायला मिळते. (काही कमेंट्समध्ये डोंगराळ भागात खरी थंडी असते, असेही स्पष्ट करण्यात आले).

7. धर्म आणि उत्सव

अमेरिका: अमेरिकेत चर्चमध्ये शांत वातावरण पाहायला मिळते.
भारत:  भारतात प्रत्येक वळणावर मंदिर, प्रत्येक महिन्यात मोठा उत्सव आणि त्यात संपूर्ण शहर सामील होते. धार्मिकता आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

8. खर्चाचे नियोजन

अमेरिका: अमेरिकेत 'सर्वकाही खूप महाग' आहे.
भारत: भारतात खर्च 'मॅनेज करण्यासारखा' (Manageable) असतो, विशेषतः कुटुंबांसाठी इथे राहणे अधिक सोयीचे होते.

9. कुटुंबाची संकल्पना

अमेरिका: अमेरिकेत सहसा 'न्यूक्लियर फॅमिली' (लहान कुटुंब) असते.
भारत: भारतात एकत्र कुटुंब पद्धती (Joint Family) आहे, जिथे आजी-आजोबा, काका-काकी, नातवंडे, चुलत भावंडे असे सर्वजण एकाच घरात किंवा जवळ राहतात.