'भांडी घासण्यापेक्षा रिक्षा चालवणं...'; महिला रिक्षाचालकाचे विचार लाखोंच्या मला भिडले, पुढे तर म्हणाली...

प्रवासादरम्यान महिला रिक्षाचालकाने जे काही सांगितलं ते ऐकून अॅमेझॉन कर्मचारी चाटच पडली.

जाहिरात
Read Time: 1 min
AI Image

Bengaluru female auto-rickshaw driver Video viral : बंगळुरूत अॅमेझॉन कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही पोस्ट आहे बंगळुरूतील एका महिला रिक्षाचालकाबद्दल. या महिला कर्मचाऱ्याने रिक्षा चालकासोबतचा संवाद सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये महिला रिक्षा चालकाचं काम, स्वातंत्र्याबद्दलचे विचार सोशल मीडियावरील लाखो लोकांच्या मनाला भिडले आहेत.

'भांडी घासण्यापेक्षा रिक्षा चालवणं चांगलं...'

श्रेयाशी सिन्हाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिला रिक्षा चालवताना दिसते. सिन्हाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, एक महिला रिक्षा चालक तिला घ्यायला आली होती. मात्र प्रवासादरम्यान तिला फोन वापरायला अडचणी येत होत्या. ती रिक्षा चालक महिलेला मार्ग दाखवित होती. यादरम्यान दोघांमध्ये संवाद झाला. यादरम्यान महिला रिक्षाचालकाने जे काही सांगितलं ते ऐकून अॅमेझॉन कर्मचारी चाटच पडली. आपल्या आयुष्यातील निवडीबाबत इतकी स्पष्टता पाहून कर्मचारी प्रभावित झाली. रिक्षा चालविण्याचा निर्णय का घेतला, यावर बोलताना ती म्हणाली, 'भांडी घासण्यापेक्षा चांगलय की रिक्षा चालवणं. मला फिरायलाही खूप आवडतं. शिवाय रिक्षा चालवायला वेळेचं बंधन नसतं. मला हवा तितका वेळ मी रिक्षा चालवू शकते आणि कुठेही जाऊ शकते.'

Advertisement

ज्या महिला स्वातंत्र्य आणि स्वावलंबी क्षेत्र निवडतात अशा महिलांचा मला कौतुक वाटतं असंही या व्हिडिओमध्ये महिला कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.