स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिकने त्याची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Maahika Sharma), त्याच बरोबर त्याचे पाळीव प्राणी आणि मुलगा अगस्त्य (Agastya) यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात एक फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये हार्दिक आणि माहिका एका मंदिरात एकत्र पूजा करताना दिसत आहेत. एका आणखी फोटोमध्ये हार्दिक माहिकाच्या गालावर 'किस' करताना (Kiss) दिसत आहे. इतर काही फोटोंमध्ये हार्दिक आणि माहिका वर्कआउट (Workout) करताना दिसत आहे. शिवाय जीममध्ये (Gym) खूप मस्ती करताना ही दिसत आहेत. एका खास फोटोमध्ये हार्दिकने माहिकाला खांद्यावर उचलले आहे आणि ती मिरर सेल्फी (Mirror Selfie) घेत आहे. या व्हायरल फोटींची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
रोमँटिक बर्थ-डे सेलिब्रेशन
11 ऑक्टोबर रोजी हार्दिकने माहिकासोबत आपला 32 वा वाढदिवस एका अज्ञात समुद्रकिनाऱ्यावर साजरा केला. हा समुद्रकिनारा मालदीवमध्ये (Maldives) असावा असा अंदाज आहे. हार्दिकने माहिकासोबत आपले नाते आता इन्स्टाग्रामवर (Instagram) सांगत स्विकारले आहे. कारण त्याच्या अलीकडील बहुतांश पोस्टमध्ये माहिका दिसत आहे. त्याने मॉडेल माहिका शर्मासोबत अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्यात एका समुद्रकिनाऱ्यावरील फोटोचा समावेश आहे. जिथे त्याने माहिकाच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तसेच, रात्री बाहेर जाण्यासाठी तयार असलेल्या अवस्थेतील एक फोटोही त्याने पोस्ट केला आहे.
नताशा स्टेनकोविकसोबत झाला होता घटस्फोट
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) यांनी 2020 मध्ये कोविडच्या काळात लग्न केले होते. मात्र, मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाबद्दल एका निवेदनात हार्दिकने खुलासा केला होता की, "4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकत्र कुटुंब बनवताना जो आनंद, आदर आणि साथ अनुभवली, ते पाहता हा निर्णय खूप कठीण होता. आम्हाला अगस्त्यचे वरदान मिळाले आहे, जो आमच्या दोघांच्याही जीवनाचे केंद्रस्थान राहील. आम्ही दोघे त्याचे को-पॅरेंट्स (Co-Parents) म्हणून जबाबदारी पार पाडू," असे हार्दिकने स्पष्ट केले होते. 2020 मध्ये जन्मलेला अगस्त्य हा हार्दिक आणि नताशाचा मुलगा आहे.
हार्दिक असतो नेहमी चर्चेत
हार्दिक पांड्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असो. मग तो क्रिकेटच्या ग्राऊंडवर असो की ग्राऊंडच्या बाहेर असोय. सध्या तो त्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्मा मुळे चर्चेत आहे. या दोघांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या नात्याची कबूली दिली आहे. शिवाय त्यांचे फोटो ही सर्वांना आवडत आहेत. त्यांचे चाहते हे फोटो मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. अनेकांनी त्यांना नव्या सुरूवातीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. अनेक कमेंट त्यांच्या पोस्टवर सध्या पाहायला मिळत आहेत.