जाहिरात

CIDCO ची नवी टाऊनशिप कुठे? एकाच ठिकाणी असेल शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अन् बरचं काही, जाणून घ्या आतली बातमी

सिडकोने नवी मुंबई आणि पनवेल शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.

CIDCO ची नवी टाऊनशिप कुठे? एकाच ठिकाणी असेल शाळा, हॉस्पिटल, कॉलेज अन् बरचं काही, जाणून घ्या आतली बातमी
नवी मुंबई:

CIDCO Township News: नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध करून देणाऱ्या सिडकोकडून (CIDCO) आता एक महत्त्वाकांक्षी नवा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणांतर्गत राज्य शासन आणि सिडकोच्या ताब्यातील मोठ्या भूखंडांचा सुयोग्य वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाची 'आयकॉनिक' शहरे विकसित केली जातील.सिडकोने हे शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलं असल्याची माहिती आहे. सिडकोने नवी मुंबई आणि पनवेल शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. 

काय आहे 'आदर्श शहर' विकास धोरण?
फक्त सिडकोच नाही, तर राज्यातील विविध प्राधिकरणांकडील (Authorities) भूखंडांचा योग्य वापर व्हावा यासाठी 'आयकॉनिक शहर विकास' म्हणजेच 'आदर्श शहर विकास' धोरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या धोरणामुळे प्राधिकरणांच्या जमिनींचा योग्य वापर निश्चित करणे आणि विकासाला चालना देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कॅबिनेटच्या निर्णयानंतर, सिडकोकडे नवी मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. या भूखंडांचा वापर करण्यासाठी विकासकांना मोठ्या संधी मिळणार आहेत. 'Unified Development Control and Incentives Regulations, 2020' नुसार भाडेतत्त्वावर (Lease) हा विकास केला जाईल.

नक्की वाचा - MNS Rada: मनसेचा 'खळ्ळखट्याक' पॅटर्न! गिरगावातील गुजराती रेस्टॉरंटमध्ये मराठी भाषेवरून तुफान राडा

टाऊनशिपचे स्वरूप कसे असेल?
या टाऊनशिप्स विविध संकल्पनांवर (Themes) आधारित असतील. यामध्ये एकात्मिक वसाहती (Integrated Townships) उभारल्या जातील. ज्यात शाळा, रुग्णालये, राहण्याचे ठिकाण आणि काम करण्याची जागा एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. मुख्यतः पुढील संकल्पनांवर आधारित टाऊनशिप विकसित होतील असं सांगितलं जात आहे. त्याचा फायदा सर्व सामान्यांना होणार आहे. शिवाय एकाच ठिकाणी सर्व सोयीसुविधाही मिळतील. त्यामुळे या टाऊनशिपबाबत आतात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

  • टेक्नॉलॉजी हब (Technology Hub): माहिती तंत्रज्ञान केंद्रे
  • इको-टुरिझम सिटी (Eco-Tourism City): पर्यावरणस्नेही पर्यटन शहर
  • हेरिटेज-आधारित शहर (Heritage City): ऐतिहासिक वारसा जपणारी शहरे
  • आर्थिक केंद्र (Financial Hub) आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक केंद्र: व्यापार-उद्योगाला चालना देणारी केंद्रे.
  • सिडकोकडून भूखंड लिलाव पद्धतीने भाडेतत्त्वावर विकासकांना दिले जातील. विकासकांना भाडेपट्टा करारनाम्यातील अटी आणि नियमांचे (Regulations) पालन करणे बंधनकारक असेल.

कुठे उभारल्या जाणार टाऊनशिप्स?

  • सध्या उपलब्ध माहितीनुसार, सिडको खालील ठिकाणी टाऊनशिप उभारू शकते.
  • खोपटा टाऊनशिप: उरण आणि पनवेल तालुक्यात सुमारे 9,394 हेक्टर क्षेत्रावर.
  • खारघर हिल पठार टाऊनशिप: सुमारे 106 हेक्टरवर निवासी आणि व्यावसायिक विकास केला जाईल. यासाठी अंदाजित खर्च ₹18,900 कोटी असेल.
  • पालघरमध्ये टाऊनशिप: नवी मुंबईसारखीच टाऊनशिप पालघरमध्ये 440.37 हेक्टर जमिनीवर विकसित करण्याचा विचार आहे.
  • नावडे नोड टाऊनशिप: नवी मुंबईतील नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी दोन खोल्यांची घरे असलेली स्वतंत्र टाऊनशिप प्रस्तावित आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com