Ex-Army Officer Love Story : सोशल मीडियाच्या या युगात, जिथे लोकांशी कनेक्ट होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, तिथे एका माजी लष्करी अधिकाऱ्याने एक जुनं, हाताने लिहिलेलं प्रेमपत्र शेअर केलं आहे. हे पत्र त्यांना त्यांच्या तत्कालीन प्रेयसीने आणि आताच्या पत्नीने लिहिलं होतं. हे लव्ह लेटर इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालं आहे. या पत्रातील प्रेम भावना पाहून युझर्सनी आनंद व्यक्त केलाय. त्याचबरोबर सध्या या गोष्टी नात्यांमध्ये कमी होत चालल्या आहेत, असंही मत युझर्स व्यक्त करतायत.
व्हायरल व्हिडिओमध्ये, कॅप्टन धर्मवीर सिंह यांनी सांगितलं की हे पत्र 2001 साली, चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये सामील झाल्यावर काही दिवसांनी लिहिलं गेलं होतं. कॅप्टन सिंग यांनी लिहिलं आहे, "हे पत्र 10 डिसेंबर 2001 रोजी लिहिलं गेलं होतं. मी 1 नोव्हेंबर 2001 रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये रुजू झालो होतो. हे पत्र माझ्या 'ठकुराईन'ने लिहिलं होतं, जी त्यावेळी माझी प्रेयसी होती आणि तिला 'ठकुराईन' म्हणण्याची परवानगी होती."
( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
500 पुशअप्स मारले
अधिकाऱ्यांनी सांगितलं की या पत्रासाठी त्यांना सैनिकी अकॅडमीमध्ये 500 पुशअप्स मारावे लागले, कारण सैनिकांना असं केल्यावरच पत्र दिलं जायचं. "आमचे सीनिअर्स आम्हाला 100-50 पुशअप्स मारायला सांगून आमची पत्रं द्यायचे. पण हे पत्र खूप मोठं होतं आणि त्याचं वजन बघून सीनिअर्सनी मला 500 पुशअप्स मारायला लावले."
ते पुढे लिहितात, "हे अकॅडमीमध्ये मला मिळालेलं पहिलं पत्र होतं. पत्र लिहिण्याचा तो खूप चांगला काळ होता. लिहिण्यासाठी जितकी जास्त मेहनत घ्यावी लागे, तितक्या भावना जास्त काळ टिकायच्या."
लव्ह स्टोरी व्हायरल
आतापर्यंत, या व्हिडिओला 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि त्यावर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये बहुतेक लोक माजी लष्करी अधिकाऱ्याच्या लव्ह स्टोरीनं प्रभावित झाले आहेत.
एका युझरने लिहिलं, "किती सुंदर हस्ताक्षर आहे. माफ करा, पण मी स्वतःला हे वाचण्यापासून थांबवू शकलो नाही. 2001 मध्ये, तुमची 'ठकुराईन' माझ्यासारखीच भावुक होती." दुसऱ्या एका युजरने लिहिलं, "मला वाटतं की माझ्यासारख्या अनेकांनी हे वाचण्याचा प्रयत्न केला असेल. तुमच्याकडे आणखी पत्रं असतील तर ती प्रकाशित करण्याचा प्रयत्न करा, ती खूप अप्रतिम आहेत. सुंदर हस्ताक्षराची मनाला भिडणारी प्रेम कहाणी. 500 पुशअप्स मारण्यालायक!"
एका दुसऱ्या युझरने लिहिलं, "ज्या पद्धतीने तिने लिहिलं आहे, 'तुम्हाला माझ्या पत्रांसाठी शिक्षा होईल, हा विचारही मला आवडत नाही', ते खूप गोड आहे."