Chinese Gamer Hotel room Viral Video: ऑनलाईन गेमिंगचे व्यसन माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचे एक धक्कादायक उदाहरण चीनमधील चांगचुन शहरात समोर आले आहे. एका ई-स्पोर्ट्स हॉटेलमध्ये सलग दोन वर्षे वास्तव्यास असलेल्या एका पाहुण्याने रूम सोडल्यानंतर, तिथली अवस्था पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. संपूर्ण खोलीत सुमारे ९० सेंटीमीटर ते १ मीटर उंचीचे कचऱ्याचे ढीग साचले होते.
गेमिंगचं वेड, 2 वर्ष खोलीबाहेर पडलाच नाही..
हॉटेलची रूम म्हटली की डोळ्यासमोर चकाचक गाद्या आणि लख्ख बाथरुम येते. मात्र, चीनमधील एका हॉटेलमध्ये जे पाहायला मिळाले, त्याने माणुसकी आणि स्वच्छतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका 'गेमिंग ॲडिक्ट' तरुणाने तब्बल दोन वर्षे हॉटेलमध्ये राहून खोलीचे अक्षरशः कचराकुंडीत रूपांतर केले. 'द सन'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हा तरुण खोलीबाहेर न पडता फक्त ऑनलाईन गेम्स खेळण्यात मग्न होता. तो ऑनलाईन जेवण मागवायचा आणि खायचा.
Kalyan News: 2 तरुणी 1 तरूण अन् दारू पार्टी! नशेत रस्त्यावरच जोरदार तमाशा, Video Viral
ज्यावेळी हा तरुण हॉटेल सोडून गेला, तेव्हा सफाई कर्मचाऱ्यांनी खोलीचे दार उघडले. समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात अन्नाची पाकिटे, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि वापरलेले टॉयलेट पेपर इतक्या मोठ्या प्रमाणात होते की, त्या ढिगाऱ्यांची उंची ३ फुटांपर्यंत पोहोचली होती. बाथरुममधील सिंक आणि कमोड कचऱ्याने पूर्णपणे तुंबले होते.
व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण
हे हॉटेल विशेषतः ई-स्पोर्ट्स खेळाडूंसाठी बनवण्यात आले होते, जिथे हाय-स्पीड इंटरनेट आणि अद्ययावत संगणक उपलब्ध होते. मात्र, या सुविधेचा असा भयानक वापर होईल, याची कल्पना हॉटेल मालकांना नव्हती. तीन दिवस रात्रंदिवस साफसफाई आणि निर्जंतुकीकरण केल्यानंतरही खोलीतून दुर्गंधी जात नव्हती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तरुणांच्या ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या व्यसनावर चर्चा सुरू झाली आहे.
Chinese gamer, addicted to video games, holed up in a hotel room for 2 years without ever leaving—food delivered via apps.
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 19, 2025
When he finally moved out, cleaners found garbage piled 1 meter high, burying his desk and chair😭
pic.twitter.com/k5lS3BI7BI
या तरुणाच्या रुमचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण खोलीत कचऱ्याचा अक्षरश: ढीग साचला आहे. जिकडे तिकडे पाण्याच्या बॉटल, कागद, टिश्यू पेपर पडले आहेत. हा कचऱ्याचा ढीग तब्बल 1 मीटर उंच पोहोचला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत ऑनलाईन गेमिंगचे वेड भयंकर असल्याचे म्हटले आहे.
Rare Pregnancy Case: ब्रेन ट्युमर काढायला गेली, आई झाली! 30 तज्ज्ञ डॉक्टर हादरले; नेमकं काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world