अर्रर्र! स्टेजवरच लेहंग्याची पिन निघाली, तरीही ती नाचत राहिली; 14 लाख लोकांनी पाहिलाय 'हा' VIDEO

Young Girl Skirt Open On Stage Viral Video: ‘आझाद’ चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘ओये अम्मा’ गाण्यावर थिरकत असतानाच तिचा घागरा सैल होतो, मात्र जराही गोंधळून न जाता ती परिस्थिती हाताळते ज्यामुळे सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Girl Skirt Open On Stage Viral Video: सोशल मीडियावर हटके, धमाकेदार डान्सचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंमधील  नृत्य करणाऱ्यांच्या अदा अन् कला नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या एका तरुणीच्या डान्सचा व्हिडिओही माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमधील तरुणी ‘आझाद' चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘ओये अम्मा' गाण्यावर थिरकत असतानाच तिचा घागरा सैल होतो, मात्र जराही गोंधळून न जाता ती परिस्थिती हाताळते ज्यामुळे सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्टेजवर ‘आझाद' चित्रपटातील सुपरहिट गाणे ‘ओये अम्मा' यावर नृत्य सादर करत असताना तिच्या घागराची पिन अचानक सैल होते. परंतु, तिने ज्या पद्धतीने हा प्रसंग हाताळला, त्यामुळे केवळ तिचे कौतुकच नाही, तर लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 14 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

नृत्य सादर करताना मुलीच्या घागराची पिन सैल होते, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. घागरा अचानक खाली घसरायला लागल्यावर कोणताही सामान्य व्यक्ती गोंधळून गेला असता किंवा नृत्य थांबवले असते. मात्र, या मुलीने हार मानली नाही. तिने परिस्थिती इतक्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने हाताळली की प्रेक्षकांनाही याची कल्पना आली नाही. घागरा सैल होताच तिने तो एका हाताने घट्ट पकडला आणि दुसऱ्या हाताने नृत्याच्या सर्व स्टेप्स पूर्ण केल्या. तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आत्मविश्वास पाहून असे वाटलेच नाही की तिच्यासोबत असा अपघात घडला आहे.

या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचे नृत्य कौशल्य आणि त्याहून अधिक तिचा आत्मविश्वास पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले की, "जर ती दुसरी कोणी असती तर लाजेने नाचणे थांबवले असते, पण या मुलीने तिच्या कलेवर विश्वास ठेवला आणि मने जिंकली." आणखी एका वापरकर्त्याने याला "दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करणे" असे म्हटले आहे.

Advertisement

लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा LIVE थरार! प्रेयसीला गोळ्या घातल्या...नंतर सर्वांसमोर नाचत बसला, पाहा Video